Suhas Dashrathe esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : सुहास दाशरथे गटाला आणखीन एक धक्का,मनसेतून चौघांची हकालपट्टी

औरंगाबादेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुहास दाशरथे गटाला आणखीन एक धक्का बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबादेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) गटाला आणखीन एक धक्का बसला आहे. या गटातील चार कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रमेश पुरी, चेतन शर्मा, संदीप कुलकर्णी व दीपक पवार अशी त्या चार कार्यकर्त्यांची नावे आहेत. त्यांनी पक्षाची बदनामी केल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून मनसेत गटबाजी वाढली होती. त्यातूनच १४ डिसेंबरच्या पक्ष प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यात सुहास दाशरथे यांची जिल्हाध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. आता त्यांच्या गटातील चार कार्यकर्त्यांना काढल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Aurangabad MNS Update Four Party Members Of Suhas Dashrathe Group Removed From Party)

पत्रकात काय म्हटले आहे?

मनसेतून (Maharashtra Navnirman Sena) चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे पक्षाने काढलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे. पत्रकात म्हटले आहे, की सर्व वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार, संभाजीनगर येथील सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्ष विरोधी आणि नेत्यांच्या विरोधात चुकीची पोस्ट-वक्तव्य केल्यामुळे रमेश पुरी, चेतन शर्मा, संदीप कुलकर्णी व दीपक पवार यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. वरील बाब त्यांना वारंवार समजावून सांगून देखील पक्ष बदनाम होईल, असे कृत्य करित असल्यामुळे त्यांच्यावर संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

तरी वरील नावांशी आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही संबंध नाही. यापुढे जर त्यांनी पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता (महाराष्ट्र सैनिक) म्हणून कुठेही समाजात वावरताना उल्लेख केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पत्रकावर मनसेचे राज्य प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, दिलीप पाटील बनकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Chh. Sambhajihnagar Election Reslut : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता

Virat Kohli च्या रनमशीनला ब्रेक! १७ वर्षात सर्वाधिक कमी सरासरीची नोंद, पाहा प्रत्येक वर्षाचा बॅटिंग अ‍ॅव्हरेज

Nashik Vidhan Sabha Vote Counting: देवळालीचा निकाल सर्वप्रथम, नाशिक पश्‍चिम सर्वांत उशिरा; जिल्ह्यात उद्या मतमोजणी

Latur Assembly Election 2024 : अठरा हजार कोटी निधी आणल्याचा दावा, पण विकास दिसला का?

SCROLL FOR NEXT