औरंगाबाद : सातारा-देवळाई भाग महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या भागात ड्रेनेजलाइन टाकण्याचा प्रस्ताव कागदोपत्री सुरू आहे. आता ही योजना केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये होणार आहे. पण गेल्या चार वर्षात योजनेच्या खर्चात तब्बल ५५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता ड्रेनेजलाईनचा प्रस्ताव २७५ कोटींवर गेला आहे.
सातारा-देवळाई भाग सहा वर्षापूर्वी महापालिकेत समाविष्ट करण्यात आला. तेव्हापासून या भागात विकास कामांचा स्वप्न दाखविली जात आहेत. मात्र आजही नागरिक रस्ते, पाणी, ड्रेनलाईन, पथदिव्याविना त्रस्त आहेत. या भागात ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी महापालिकेने यश इनोव्हेशन या प्रकल्प सल्लागार संस्थेची (पीएमसी) नियुक्ती केली होती. या संस्थेने २२० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केला. त्यानंतर हा डीपीआर नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला.
नगरविकास विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता घेण्याची सूचना केली. त्यानुसार एमजीपीकडे प्रस्ताव देण्यात आला. एमजीपीने तांत्रिक तपासणी केल्यानंतर हा डीपीआर २३२ कोटींचा झाला. हा डीपीआर पुन्हा नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती सूचविण्यात आल्या. सुधारणानंतर डीपीआऱ २५४ कोटीवर गेला. आता राज्य शासनाने हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमजीपीने यावर्षीच्या डीएसआरनुसार डीपीआर २७५ कोटीवर गेला आहे. वर्षभरात या प्रकल्पाची किंमत २१ कोटीने तर सुरवातीचा विचार केला तर ५५ कोटीने वाढला आहे.
कमल तलावाचे सुशोभीकरण
आमखास मैदानाजवळील कमल तलावाचे सुशोभीकरण अमृत-२ योजनेतून केले जाणार आहे. त्यासाठी तीन कोटीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तलावाला तीनही बाजूंनी संरक्षण भिंत बांधणे, तलावाचे सुशोभीकरण करणे, पर्यटकांसाठी बसण्याची व्यवस्था, मुलांसाठी खेळणी, ओपन जीम अशी व्यवस्था याठिकाणी राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.