औरंगाबाद - चिकलठाण्यातील मिनी घाटीत ऑक्सिजन प्लाँटचे भाजपकडून प्रतिकात्मक उद्घाटन करुन आंदोलन करण्यात आले. 
छत्रपती संभाजीनगर

भाजप आक्रमक, मिनी घाटीत ऑक्सिजन प्लाँटचे प्रतिकात्मक उद्घाटन करुन केले आंदोलन

कोरोनाच्या महामारीमध्ये केंद्र व राज्य सरकार सर्व जिल्ह्यांना सहा ते सात महिन्यांपासून विविध उपाययोजना करण्यासाठी सुचवत आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : शासनाच्या दिरंगाईमुळे रुग्णांचे जीव जात आहे. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही, असा आरोप करत भाजपतर्फे चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील (मिनी घाटीत) (Mini Ghati) ऑक्सिजन प्लाँटचे मंगळवारी (ता.११) प्रतिकात्मक उद्घाटन करुन आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष (Aurangabad BJP) संजय केनेकर (Sanjay Kenekar) म्हणाले, की दिरंगाई व निष्काळजीपणाने अनेकांचे ऑक्सिजन अभावी जीव जात आहे. मिनी घाटीत चार जणांचा ऑक्सिजनअभावी (Oxygen Shortage) बळी गेला आहे. त्यांना कोणतीही भरपाई मिळाले नाही. रुग्णांना ऑक्सिजन दिला जात नाही. ऑक्सिजन प्लाँट उभारण्यासाठी दोन महिने लागणार आहे. आम्ही दाखवण्यासाठी आंदोलन करत नाही. (Aurangabad News BJP Completes Opening Of Oxygen Plant At Mini Ghati as Symbolic)

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाच्या महामारीमध्ये केंद्र व राज्य सरकार सर्व जिल्ह्यांना सहा ते सात महिन्यांपासून विविध उपाययोजना करण्यासाठी सुचवत आहे. त्या उपाययोजना स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे. परंतु शासकीय काम आणि सहा महिने थांब या म्हणीचा प्रत्यय औरंगाबादमधील जनता रोज घेत आहे. केंद्र सरकारच्या योजनामधून मंजूर झालेले ऑक्सिजन प्लाँट हे कागदावर टेंडर देऊन कागदपत्रे करण्याचा घाट प्रशासन करत आहे. असे नसते तर सहा महिन्यांपूर्वी एखाद्या शासकीय कामाचा आदेश निघून ते काम या प्रचंड मोठ्या महामारीमध्ये जर उपयोगी येत नसेल तर या शासकीय अधिकारी, पदाधिकारी यांच्या दप्तर दिरंगाईमुळे व शासकीय काम आणि सहा महिने थांब या ध्येय धोरणामुळे औरंगाबाद जिल्ह्यामधील व मराठवाड्यामधील जनता मृत्यूच्या दारात रोज लोटली जात आहे, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे; संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाच्या आमदाराची खोचक टीका

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! ऋषभ पंतवर तब्बल २७ कोटींची बोली

Rishabh Pant IPL Mega Auction 2025 : ऋषभ पंतला बम्पर लॉटरी! SRH, LSG यांनी जबरदस्त जोर लावला; श्रेयसचा 26.75cr चा विक्रम मोडला

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result : 'ईव्हीएम'विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार - डॉ. हुलगेश चलवादी

Latest Maharashtra News Updates : रांचीतील राजभवनाबाहेर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दाखवली एकजूट, सरकार स्थापनेचा दावा

SCROLL FOR NEXT