छत्रपती संभाजीनगर

ऑरिकमध्ये ‘आयनॉक्स’ची गुंतवणूक, दीडशे कोटींतून उभारणार ऑक्सिजन प्रकल्प

कंपनीने जागा ताब्यात घेतली असून येत्या पंधरा दिवसांत या कंपनीच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती ऑरिक सिटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोना महामारीच्या काळात उद्योगांना पाठबळ देण्याचे काम राज्य, केंद्र सरकारतर्फे केले जात आहे. त्यामुळे देश-विदेशातील गुंतवणूकही भारतात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स कंपनीने येथील ऑरिक सिटीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. शेंद्रा येथील आठ एकरात ही कंपनीत १५० कोटींची गुंतवणूक करणार आहे. यातून दोनशे रोजगार उपलब्ध होणार आहेत. शुक्रवारी (ता.१६) या कंपनीने जागा ताब्यात घेतली असून येत्या पंधरा दिवसांत या कंपनीच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती ऑरिक सिटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मराठवाड्यासाठी उपयुक्त पुढाकार : ऑरिक सिटीमध्ये रशियन स्टिल कंपनीनंतर आता भारतीय उद्योग समूहाची ‘आयनॉक्स’ कंपनी पहिल्या टप्प्यात दिडशे कोटींची गुंतवणूक करले. ही कंपनीत द्रवरुप ऑक्सीजन तयार होणार आहे. सध्या कोरोनाच्या काळात ऑक्सीजन कमरतात सर्वत्र भासत असताना ‘आयनॉक्स’ने घेतलेला पुढाकार औरंगाबाद, मराठवाड्यासाठी उपयुक्त ठरेल. राज्यात मुंबई आणि पुण्यात या कंपनीतर्फे ऑक्सीजन निर्मिती केली जाते. ऑरीक सिटीत या कंपनीचे काम सध्या चंदन डे पहात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT