ganesh sakal
छत्रपती संभाजीनगर

औरगाबाद विसर्जनासाठी तगडा बंदोबस्त

दोन वर्षांनंतर होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी गणेशभक्तांत उत्साह

सकाळ वृत्तसेवा

औरगाबाद: लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जनादरम्यान पोलिस दलाने तितक्याच नेटाने तगडा बंदोबस्त लावला असून यासाठी तब्बल दोन हजार ७१८ पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक दर्जाचे ४० अधिकारी, १३६ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच दोन हजार ५४२ महिला, पुरुष अंमलदारांचा समावेश असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी छावणीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी २२० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. याशिवाय राज्य राखीव दलाच्या एका कंपनीचे तीन प्लाटून (जवळपास ९६ अधिकारी, कर्मचारी) आणि शीघ्र कृती दलाची एक कंपनी असणार आहे.

पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण बारा महत्त्वाच्या मिरवणुका निघणार आहेत. तर अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १० सप्टेंबर रोजी छावणी हद्दीतील विसर्जन मिरवणूक निघणार आहे. पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ७८ ठिकाणी फिक्स पॉइंट असतील. तत्पूर्वी ८ सप्टेंबर रोजी आयुक्तालयातून मुख्य रुट मार्च निघणार आहे.

मुख्य मिरवणूक (संस्थान गणपती ते जिल्हा परिषद मैदान), सिडको हडको, एमआयडीसी सिडको ठाणे हद्दीतील चिकलठाणा, मुकुंदवाडी, नवीन औरंगाबाद, एमआयडीसी वाळूज हद्दीतील वाळूज महानगर, वाळूज, दौलताबाद हद्द, हर्सूल, सातारा हद्द, छावणी, जिन्सी या आहेत.

मुख्य मिरवणुकीच्या मार्गावर उंच हॉटेल, इमारतीवरही पोलिस बंदोबस्त लावला असून या मार्गावर तब्बल १० ठिकाणी उंच इमारतीवर २१ पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. प्रामुख्याने मुख्य मिरवणूक ही क्रांती चौक पोलिस ठाणे आणि सिटी चौक या दोन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणार आहे. याच मार्गावरील दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गल्ली बोळात जवळपास ९६ पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे.

पाच ठिकाणी अग्निशमन दल महापालिकेच्या अग्निशमन दलाचे वाहने उपलब्ध करण्यात आली असून नियंत्रण कक्ष, सिटी चौक, टीव्ही सेंटर, जिल्हा परिषद मैदान आणि नेहरू चौक छावणी (१० सप्टेंबर रोजी) अशा पाच महत्त्वाच्या ठिकाणी अग्निशामक दलाची वाहने तैनात असणार आहेत. या वाहनांची गरज पडल्यास वायरलेसद्वारे संदेश देताच ही वाहने तत्काळ हजर होतील. याशिवाय घाटी रुग्णालयातून रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी नऊपासून सिटी चौक पोलिस ठाणे येथे पोलिस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी हे पथकासह तैनात असतील. असेच एक पथक १० सप्टेंबर रोजी सकाळी नऊपासून छावणी पोलिस ठाण्यात कार्यरत राहणार आहे.

ध्वनिक्षेपकाचा आवाज मोजण्यासाठी विशेष पथक शहरात ७८ ठिकाणी विशेष फिक्स पॉइंट गल्लीतही असेल पोलिसांची पेट्रोलिंग विसर्जनाच्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत वाद्यास परवानगीमशिदींजवळ विशेष बंदोबस्त विसर्जन मिरवणुका जाणाऱ्या ठिकाणी असणाऱ्या मशिदींच्या ठिकाणी पोलिसांचा खास बंदोबस्त असणार आहे

मिरवणुकांत सहभागी गणेश भक्तांकडून मशिदांवर गुलाल उडला जाऊ नये म्हणून मशिदींच्या परिसरात कनादी लावण्यात येणार आहेत, तसेच गरजेनुसार बॅरिकेडस् ही लावण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी केल्या आहेत. मुख्य मिरवणुकीच्या मार्गावर जवळपास १८ मशीद, दर्गा असून या ठिकाणी ५४ अंमलदारांचा बंदोबस्त असेल, त्यापैकी १८ अंमलदार सशस्त्र तैनात असतील.

ध्वनिप्रदूषण तपासणी पथक

प्रत्येक पोलिस ठाण्याला एक अधिकारी आणि दोन अंमलदार यांना ध्वनिमापक यंत्र वापराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलिस बंदोबस्तादरम्यान ध्वनिमापक यंत्राद्वारे आवाजाची चाचणी केली जाणार आहे.

सात ठिकाणी ‘वॉच टॉवर्स’

पोलिस आयुक्तांनी मुख्य मिरवणूक, सिडको हडको मिरवणूक आणि छावणी मिरवणूक (१० सप्टेंबर) या तीन महत्त्वाच्या मिरवणुकीच्या मार्गावर जवळपास अनुक्रमे तीन, दोन आणि दोन असे सात वॉच टॉवर्स उभारले आहेत. यासाठी १४ अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अंमलदार दुर्बिणीतून पाहणी करतील. विशेष म्हणजे आपल्या समोरील चौकातून कोणते मंडळ किती वाजता पुढे गेले याची नोंदही यंदा केली जाणार आहे.

विशेष पथके

गणेश विसर्जनादरम्यान गुन्हे शाखा, दारूबंदी, साध्या वेशातील विशेष शाखा, वाहतूक शाखा, ध्वनिप्रदूषण, घातपात विरोधी तपासणी, छेडछाडविरोधी, दहशतवादविरोधी आदी पथके कार्यरत असणार आहेत. याशिवाय हरविलेल्या, सापडलेल्या मुलांमुलींसाठी सिटी चौक आणि छावणी येथे दोन माहिती केंद्रेही उभारण्यात येणार आहेत. यासाठी महिला, पुरुष असे १२ अंमलदारांचा बंदोबस्त असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT