महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन्ही पक्षांकडून सध्या स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरु आहे. यासाठी स्थानिक स्तरावर त्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
औरंगाबाद : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार Mahavikas Aghadi Government असताना आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी होईल का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या राजकीय पटलावर तीनही पक्षांच्या नेत्यांकडून होत असलेली विधाने पाहता याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटतील का, याचीही चर्चा सुरू झाली आहे. महापालिकेसाठी Aurangabad Municipal Corporation महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांकडून निवडणुकीची स्वतंत्र तयारी सुरु असली तरी शिवसेना महाविकास आघाडीसाठी आग्रही दिसते. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मात्र पक्ष जो आदेश दिले त्यानुसार पुढील दिशा ठरविली जाईल, असे सांगत आहेत. २०१५ चे पक्षीय बलाबल बघितले तर शिवसेना Shiv Sena २९, काँग्रेस Congress १० तर राष्ट्रवादी Nationalist ३ यांचा आकडा हा ४२ पर्यंतच पोचतो. यातून बहुमताचा आकडा पूर्ण होत नाही. त्यामुळे शिवसेनेला सत्ता कायम राखण्यासाठी टफ फाईट राहणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन्ही पक्षांकडून सध्या स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरु आहे. यासाठी स्थानिक स्तरावर त्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole हे स्वबळासाठी दंड थोपटत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आपले पत्ते उघडण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून महाविकास करण्यासाठी प्रयत्न राहिल असे संकेत मिळत आहे. राज्यात ज्या प्रकारे तिन्ही पक्ष एकत्र आहे त्याच प्रमाणे महापालिकेत सुद्धा Aurangabad तीन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढविण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहे. महाविकास आघाडी झाली तरी यामध्ये जागावाटपाचा तिढा तसेच इच्छुकांची समजूत घालणे, ही तिन्ही पक्षांसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. Aurangabad Political News Is Shive Sena, Congress And NCP Come Together?
शहरातील एकूण वॉर्ड - ११५
पक्षीय बलाबल (२०१५ निवडणूक पक्षाच्या चिन्हावरील)
----------
शिवसेना-२९
एमआयएम-२५
भाजप-२३
कॉंग्रेस-१०
राष्ट्रवादी कॉंग्रेस-३
बसप-५
रिपाई-१
अपक्ष-१९ (शिवसेना-भाजप समर्थकांसह)
प्रत्येक पक्षाला स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करण्याचा हक्क आहे. शिवसेनेच्या सर्व बुथ कमिटी, वॉर्ड समित्या कार्यरत आहेत. कोणत्या वॉर्डात कोण इच्छुक आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व्हावी यासाठी आमचा प्रयत्न राहील.
-आमदार अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
पक्षाच्या वॉर्ड समित्या, बूथ बांधणी सुरु आहे. मी पक्षात आल्यावर जवळपास ४०० पेक्षा जास्त विविध पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मागील दीड वर्षापूर्वी पक्षाने महापालिकेसाठी इच्छुकांचे अर्ज मागविले होते. आता जे पुन्हा इच्छुक असतील त्यांचे अर्ज आम्ही मागवणार आहोत. महाविकास आघाडी होईल किंवा नाही ते पक्षाचे वरिष्ठ ठरवतील. ते जो आदेश देतील तो अंतिम राहिल मात्र निवडणुक लढविण्याची आमची तयारी पूर्ण आहे.
-हिशाम उस्मानी, शहराध्यक्ष, काँग्रेस
शहरातील ८० टक्के बुथ कमिट्यांची बांधणी आम्ही केली आहे. निवडणूक कधीही लागली तरी आमची तयारी आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी होण्याचे संकेत दिले जात आहे. महापालिकेसाठी आम्हाला पक्षाचा जो आदेश दिला जाईल त्याचे स्थानिक स्तरावर पालन होईल. निवडणुकीच्या अनुषंगाने जो काही निर्णय होईल त्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे.
-विजय साळवे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.