Aurangabad dasara sale Three hundred crores turnover 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : तीनशे कोटींची उलाढाल : आठशे चारचाकी, चार हजार दुचाकींची विक्री

पाचशे गृहप्रवेश ; सहाशे घरांची बुकिंग

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनामुळे बाजारपेठेला आलेली मरगळ दसऱ्याला दूर झाली. साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या या सणाला बाजारपेठेत तीनशे कोटींची उलाढाल झाली. बुधवारी (ता.५) आठशे चारचाकी तर चार हजार दुचाकींची विक्री झाली. यामुळे वाहन बाजाराबरोबर सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आणि रियल इस्टेट मार्केटने उसळी घेतल्याचे बघायला मिळाले.

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच बाजारपेठेत मोठी उलाढाला बघायला मिळाली. यंदाच्या नवरात्रोत्सवात कधी नव्हे अशी वाहन विक्री झाली. या नऊ दिवसात दिड हजार चारचाकी वाहनांची विक्री झाली. तर दसऱ्याच्या मुहुर्तावर चारचाकी घेणाऱ्यांची यादी मोठी होती. यातही अनेक चारचाकी वाहनांना वेटिंग असल्यामुळे अनेकांना मुहुर्तावर चारचाकी घेता आली नाही. यंदाचा दसरा हा बाजारपेठेतील दोन वर्षांची मरगळ झटकणारा असल्याची प्रतिक्रियाही व्यापाऱ्यांनी दिली. एवढेच नव्हे, तर दिवाळीही अशीच राहणार असल्याची भावनाही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण

दसऱ्याच्या मुहुर्तावर शहर व परिसरात पाचशे जणांनी गृहप्रवेश केला. यासह क्रेडाई औरंगाबादतर्फे मराठवाडास्तरीय घेण्यात आलेल्या एक्स्पोमुळे मराठवाड्यातील लोकांना औरंगाबादेतील घर घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. याच एक्स्पोत ३०० घरांची तर एक्स्पो संपल्यानंतर अशा एकूण ५०० घरांची बुकिंग झाली. तर २ बीएचके, रो-हाऊसेसमध्ये गृहप्रवेश केला. जवळपास ११० कोटींची उलाढाल झाली. डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढणार आहे. त्यामुळे आता दिवाळीतच घर घेण्याचा अनेकांचा मानस आहे. यामुळे खरेदीदारांची संख्या वाढू लागली आहे. अशी माहिती क्रेडाई औरंगाबादचे अध्यक्ष नितीन बगडीया यांनी सांगतिले.

इलेक्‍ट्रॉनिक्स मार्केट

दसऱ्याला घर-वाहन आणि सोने खरेदीबरोबर इलेक्ट्रॉनिक्स वस्तु खरेदीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदाही दसऱ्यानिमित्ताने सानिया डिस्ट्रिब्युटर्ससह अन्य विक्रेत्यांनी ग्राहकांसाठी बंपर ऑफर्स दिल्यामुळे त्या ऑफर्सचा लाभ घेत वस्तू खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. यात प्रामुख्याने प्रिमीयम प्रोडक्टसह मोठा टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यासह एसी या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांचा कल होता. शहर व जिल्ह्यात १० ते १५ कोटींची उलाढाल इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये झाल्याची माहिती सानियाचे पंकज अग्रवाल यांनी दिली.

ऑटोमोबाईल क्षेत्र

कोरोनापासून सुरक्षित प्रवासासाठी स्वत:चे वाहन असावे या भावनेपोटी वाहन घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वाहनाच्या किंमती वाढल्यानंतर खरेदीदारांची संख्याही तितक्याच प्रमाणावर वाढत गेली. यामुळे चारचाकी असो वा दुचाकीच्या शोरुम, येथे वाहनाची विचारणा आणि खरेदीसाठी सण-उत्सवाच्या काळात गर्दी दिसून येत आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर शहरातील विविध कंपन्यांच्या शोरुमवरून आठशे चारचाकी विक्री झाली. तर चार हजार दुचाकींची विक्री झाली. ऑटोमोबाईल क्षेत्रात दीडशे कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती धूत मोटर्सचे जनरल मॅनेजर विकास वाळवेकर यांनी सांगितले.

सोने-चांदीत २५ कोटींची उलाढाल

दसऱ्याला सोने खरेदी शुभ मानली जाते. यामुळे बुधवारी शहरातील सराफा मार्केटसह प्रत्येक सोने-चांदीच्या दुकानात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. गेल्या आठवड्याभरापूर्वी सोन्याच्या किंमती उतरल्या होत्या. आता पुन्हा दिड हजाराने वाढल्या. बुधवारी सोने ५२ हजार ३०० रुपये तोळा, तर चांदी ६२ हजार रुपयांचा दर होता. दसऱ्याच्या महुर्तावर सोने-चांदी विक्रेत्यांनी मजुरीवर सुट,चांदीच्या वस्तू भेट अशा विविध ऑफर्स दिल्याने खरेदीरांसाठी हा दसरा लाभदायी ठरला. सराफा बाजारात जवळपास २५ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सराफा असोसिएशनचे राजेंद्र मंडलिक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT