Aurangabad water scarcity sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : तब्बल एक हजार कोटींनी वाढली पाणी योजना!

केंद्र, राज्य अन् महापालिकेचा राहू शकतो हिस्सा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरासाठी राज्य शासनाने मंजूर केलेल्या १,६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची किंमत तब्बल एक हजार २० कोटींनी वाढली आहे. केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये पाणीपुरवठा योजनेचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रस्ताव तब्बल २७०० कोटी रुपयांचा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. स्टीलच्या किमती वाढल्याने कंत्राटदाराने मागणी केल्यानुसार ४२५ कोटी वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे मूळ योजना २१०० कोटींवर जाणार आहे. तसेच ओ अ‍ॅण्ड एमआरला (देखभाल दुरुस्तीसाठी) ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेचा नारळ फोडण्यात आला. जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून या योजनेचे काम केले जात आहे. १,६८० कोटी रुपयांची राज्यातील सर्वांत मोठी पाणीपुरवठा योजना असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, स्टीलच्या किमतीमध्ये मोठी भाववाढ झाल्याने कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीने योजनेची किंमत वाढविण्याची मागणी केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात आला होता. आता ही योजना केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये समाविष्ट केली जाणार आहे. त्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार अमृत-२ साठी पाठविला जाणारा प्रस्ताव हा २७०० कोटी रुपयांचा असेल, असे सूत्रांनी सांगितले. नव्या प्रस्तावात कंत्राटदाराने वाढवून मागितलेल्या ४२५ कोटींचा समावेश आहे. त्यानुसार मूळ योजना २१०५ कोटी रुपयांची असेल तर देखभाल दुरुस्तीसाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे सूत्रांनी नमूद केले.

राज्य, महापालिकेला मिळणार दिलासा

या मोठ्या योजनेसाठी महापालिकेला ६०५ कोटी रुपयांचा हिस्सा द्यावा लागणार होता. उर्वरित निधीचा बोजा हा राज्य शासनावर पडणार होता. आता अमृत-२ मधील समावेशामुळे राज्य व महापालिकेला दिलासा मिळणार आहे. अमृत-२ योजनेच्या निधीचे समीकरण अद्याप ठरलेले नसले तरी केंद्र-३० राज्य-५० तर महापालिकेचा २० टक्के हिस्सा या योजनेत असू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT