कोरोनाच्या काळात रुग्णांकडून आकारले अवाच्या सव्वा बिल
औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या(corona first and second wave) लाटेत अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क उकळले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे(collector office auarngabad) करण्यात आलेल्या लेखा परीक्षणानंतर हा प्रकार समोर आला होता. जास्तीचे उकळलेले शुल्क परत देण्यासाठी या रुग्णालयांना सूचना करण्यात आल्या आहेत. पण त्यानंतरही पैसे परत करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने महापालिकेने(aurnagabad carporation) अशा १२ रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालयांमध्ये बेडसाठी मारामार सुरू होती. या परिस्थितीचा फायदा अनेक खासगी रुग्णालयांनी घेतला. ठरावीक रक्कम जमा केल्यानंतर रुग्णांना प्रवेश दिला जात होता. असे प्रकार वाढल्याने अनेकांनी शासनाकडे तक्रारी केल्या. त्यानुसार राज्य शासनाने(state government) रुग्णांच्या नातेवाइकांकडून किती बिल घ्यावे, याचे दरपत्रक जाहीर केले होते. त्यानंतरही काही रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात बिलांची वसुली केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अशा बिलांचे ऑडिट करण्याचा निर्णय झाला.
त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ज्या रुग्णालयांनी जास्तीचे पैसे आकारले त्यांना रुग्णांच्या नातेवाइकांना पैसे परत करण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र या पत्राला देखील रुग्णालयांनी जुमानले नाही. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कारवाईसाठी महापालिकेकडे यादी सादर करण्यात आली आहे. महापालिकेने संबंधित १२ रुग्णालयांना नोटीस दिल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय (astikkumar pandey) यांनी सांगितले.
आरोग्य विभागाकडून नावांची लपवाछपवी
कोरोनाच्या संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी बिलाचा विषय समोर आला. तिसऱ्या लाटेत दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांकडून जास्तीचे बिल घेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांना केले. जास्तीचे बिल आकारले तर लेखापरीक्षक(charted accountant) यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, असा इशारा बैठकीत देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान कोणत्या रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत? याविषयी आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता, नावे सांगण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे खरेच नोटीसा बजावल्या का? याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.