वाळूज महानगर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मुंबई यांच्यामार्फत ४ ते ७ दरम्यान आयआयटी मुंबई येथे इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन वॉटर टेक्नॉलॉजी (आयसीडब्लूटी) ही जागतिक स्तरावरील परिषद झाली. यात बजाजनगर येथील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयाला आदर्श संशोधनासाठी उत्कृष्ट पाणी तंत्रज्ञानामधील योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ. प्रदीप भलगे, डॉ. गीतांजली कौशिक, प्रा. रियाजुद्दीन सिद्दीकी, प्रा. कल्याणी कोंडेकर, प्रा. कैलास चरखा आणि प्रा. ऋषिकेश आहेर यांनी ग्रामीण जल व्यवस्थापनातील विविध समस्या व त्यावरील उपाय मांडले. याबद्दल आयसीडब्लूटीमध्ये हायटेक महाविद्यालयाचा सन्मान झाला.
परिषदेमध्ये डॉ. प्रदीप भलगे यांना स्प्रिंजर नेचर या संस्थेने सर्वोत्कृष्ट संशोधन आणि सादरीकरण हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सहसचिव अमन जाधव यांनी महाविद्यालयाच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. यावेळी प्राचार्य गोंविद एस. ढगे, प्रा. अमोल अडकिणे आदी उपस्थित होते.
पुरस्काराबद्दल पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथराव जाधव, सहसचिव अमन जाधव यांनी सर्व प्राध्यापकांचे स्वागत केले. यावेळी प्रा. प्रताप एम. मोहिते, डॉ. भावना पिंगळे, प्रा. जनार्दन भोर, बी. बी. जाधव, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.