पैठण : येथील शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले आहे. बोधेगाव (ता. शेवगाव) येथे पैठण-पंढरपूर पालखी दिंडी मार्गाचे काम न झाल्याने यंदा ही पंढरीची वाट बिकटच झाली आहे.
रस्त्याच्या पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम अद्यापही काही भागांत रखडलेले आहे. शेजारचे रस्ते अरुंद आहेत. गर्दी झाल्यानंतर चेंगराचेंगरी होईल, अशीच या ठिकाणची स्थिती आहे.पालखी दिंडी मार्ग विस्तारीकरणासाठी सावलीची छत्रे असणारे बहुतांशी वृक्ष तोडण्यात आली असून पालखी मार्ग वृक्षहीन झाला आहे.
मागील वर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांना खडतर रस्त्यावरून पंढरी जवळ करावी लागत आहे. २८४ किलोमीटरचे अंतर कापून पैठण येथील शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरला जातो. या मार्गावरील खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आषाढी वारीकरिता पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची पायवाट सुखकर व्हावी, यासाठी रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी पैठण-पंढरपूर या पालखी मार्गाला मंजुरी दिली. दरम्यान, नितीन गडकरी यांनी पैठण येथे झालेल्या एका कार्यक्रमात दिवाळीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते हवेतच विरले. पैठण-पंढरपूर पालखी मार्गात अर्धा फुटापर्यंत खड्डे पडून त्यामध्ये पाणी भरले आहे. यामुळे अनेक वेळा वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती या महामार्गाची झाली आहे.
पैठण-पंढरपूर या संत एकनाथ महाराज पालखी मार्गाचे काम सुरू जरी असले तरी रस्ता पूर्ण झाला नाही. पालखी दिंडीतील वारकऱ्यांना रस्त्याचा हा मोठा त्रास सहन करत पायी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने या दिंडी मार्गाचे काम तातडीने करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.