Beed Yogurt Borrow Not given So beating the woman sakal
छत्रपती संभाजीनगर

बीड : दही उधार दिले नाही; महिलेस जबरी मारहाण

दही उधार दिले नसल्याच्या कारणावरून एका महिलेस दोघांनी लोखंडी रॉडने केली मारहाण

सकाळ वृत्तसेवा

बीड : दही उधार दिले नसल्याच्या कारणावरून एका महिलेस दोघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच जाब विचारण्यास गेलेल्या त्या महिलेची सासू, दीर व पुतण्या यांनाही त्याच दोघांनी मारहाण करून शिवीगाळ केली. या प्रकरणी दोघांविरोधात पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील किसनराव ढवळे (रा. जुजगव्हाण) व सुरेश जानु गंगावणे (रा. ढेकणमोहा, ता. बीड) अशी आरोपींची नावे आहेत. बीड तालुक्यातील जुजगव्हाण येथील सुप्रिया शरद सुरवसे या दही विकतात. सुरवसे या सुनील ढवळे यांच्या घरी गेल्या. त्यावेळी ढवळे याने दही उधार मागितले असता पूर्वी खवा घेतलेले दोनशे रुपये दिल्या शिवाय दही देणार नाही असे उत्तर सुप्रिया सुरवसे यांनी दिले. त्यामुळे आरोपी सुनील ढवळे याने सुरवसे यांना लोखंडी रॉडने हातावर मारहाण केली.

या मारहाणीत त्यांच्या कोपराचे हाड मोडले. ही घटना कळाल्यानंतर जाब विचारण्यास गेलेल्या त्या महिलेची सासू, दीर व पुतण्या यांनाही त्याच दोघांनी मारहाण करून शिवीगाळ केली. या प्रकरणी पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.ना. सोनवणे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

SCROLL FOR NEXT