केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ.भागवत कराड सकाळ
छत्रपती संभाजीनगर

भागवत कराडांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपदाचा स्वीकारला पदभार

प्रकाश बनकर

औरंगाबाद : खासदार डॉ. भागवत कराड Union Minister Of State For Finance Bhagwat Karad यांनी बुधवारी (ता.सात) केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज गुरुवारी (ता.आठ) दिल्लीतील अत्यंत मानाचे स्थान असलेल्या नाॅर्थ ब्लॉकमधील अर्थ मंत्रालयात जाऊन त्यांनी पदभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये  मराठवाड्याच्या Marathwada वाट्याला अत्यंत महत्त्वाचे अर्थ मंत्रालय Union Finance Ministry मिळालेले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार डॉ. कराड यांनी अर्थखात्याचा पदभार  स्वीकारला. यावेळी अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना अर्थ मंत्रालयातील दैनंदिन कामकाजाबद्दल माहिती दिली. या मंत्रालयात असलेले महत्त्वपूर्ण विभाग आणि त्या अंतर्गत असलेल्या योजना व त्याची अंमलबजावणी याचीही माहिती देण्यात आली. अर्थ मंत्रालयातील विविध विभागांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली.

नवी दिल्ली येथील केंद्रीय अर्थमंत्रालयात अर्थ राज्यमंत्रीपदाचा पदभार डाॅ.भागवत कराड यांनी स्वीकारला.

यामध्ये अर्थमंत्रालय असलेले वेगवेगळे विभाग प्रामुख्याने आर्थिक कार्य विभाग,  राजस्व, निर्गुंतवणूक, विमा आणि बँकिंग आदी क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी विभागाचे वरिष्ठ सचिव, अधिकारी उपस्थित होते. डॉ.भागवत कराड हे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित सर्जन आहेत. गेल्या वर्षी राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झाली आहे. सध्या देशातील अर्थव्यवस्थेत वेगाने सुधार होत असून आगामी काळात विकास दरही वाढणारा आहे. अर्थव्यवस्थेतील सुधार आणि विकास दर आणि त्यातील बारकावे डाॅ. कराडांनी समजून घेतले. मराठवाडा हा मागास भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी पायाभूत सुविधा आणि मानव विकास निर्देशांक यामध्ये मोठे काम आता डॉक्टर भागवत कराड यांच्या माध्यमातून होईल, अशी लोकांची अपेक्षा आहे. औरंगाबादला Aurangabad अद्यापपर्यंत केंद्रीय मंत्रीपद मिळालेले नव्हते. त्यामुळे औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी याप्रसंगी सांगितले.

औरंगाबाद भाजपचे पदाधिकारीही उपस्थित

भाजपचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर शिरीष बोराळकर, भाजपचे औरंगाबाद शहराध्यक्ष संजय केनेकर, भगवान घडामोडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिल्ली गाठत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या दालनास भेट देत त्यांचा सत्कारही केला. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे कुटुंबीय ही या प्रसंगी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT