Bike Taxi sakal
छत्रपती संभाजीनगर

Bike Taxi: प्रवास होणार स्वस्त! महाराष्ट्रातही बाईक टॅक्सी धावणार?, शिंदे सरकारच्या निर्णयाला रिक्षाचालकांचा विरोध

आता रिक्षाच्या निम्म्या भाड्यात सहजतेने प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने बाईक टॅक्सी सुरू करण्याबाबतचा अहवाल स्वीकारला आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आता रिक्षाच्या निम्म्या भाड्यात सहजतेने प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारने बाईक टॅक्सी सुरू करण्याबाबतचा अहवाल स्वीकारला आहे. त्याला तत्त्वतः मान्यताही दिली आहे. पण, त्यावर सरकारने काही त्रुटी सुचविल्या आहेत. त्या दूर केल्यानंतर लवकरच बाईक टॅक्सी सेवा सुरू होईल. शहरासह ग्रामीण भागातही ही सेवा असणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली.

गोवा व अन्य काही राज्यांमध्ये बाईक टॅक्सी चालवली जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही बाईक टॅक्सीची संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठीचा अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सेवानिवृत्त सनदी अधिकारी रमानाथ झा यांची समिती नियुक्त केलेली होती.

या समितीने बाईक टॅक्सी सुरू करण्याबाबतचा अहवाल गेल्यावर्षीच सरकारला सादर केला होता. त्यानंतर या अहवालातील काही सुधारणांसह सरकारने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सुचवलेल्या त्रुटी दूर करून लवकरच म्हणजे पुढील आठ ते पंधरा दिवसांत याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

एका क्लिकवर मिळेल सेवा

बाईक टॅक्सीला राज्यात प्रवासी वाहतुकीची परवानगी मिळाल्यानंतर विविध ॲपच्या माध्यमाने ही सेवा सुरू होईल. त्यानंतर प्रवाशांना एका क्लिकवर बाईकची सेवा दारातून उपलब्ध होऊ शकणार आहे. असे झाले तर एकट्याने प्रवास करणाऱ्या व्यक्ती बाईक टॅक्सी बोलावून दिवसभर शहरातील विविध कामे करू शकणार आहे.

कमी खर्चात तत्पर सेवा

एका व्यक्तीला प्रवास करायचा असेल तर बाईक टॅक्सीचे भाडे कमी आहे, तसेच बाईक टॅक्सी रिक्षा किंवा टॅक्सीच्या तुलनेत कमी जागा व्यापते. आपल्या दारात बाईक चालक येत असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. या तत्पर सेवेमुळे प्रवाशांना कमी वेळेत आपल्या इच्छित ठिकाणी पोचता येणार आहे.

शिंदे सरकारच्या निर्णयाला रिक्षाचालकांचा विरोध

महाराष्ट्रात बाईक टॅक्सीला रिक्षाचालकांनी यापूर्वीही विरोध दर्शवला होता. आता सरकारने अहवाल स्वीकारल्यानंतर बाईक टॅक्सी धावणार हे जवळपास निश्चित झाले आहे. शिंदे सरकारच्या या हालचालींवर रिक्षाचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने परवानगी दिल्यास रिक्षाचालकांचे नुकसान होईल आणि आगामी काळात रिक्षाचालकांवरही टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येईल, अशी भीती छ. संभाजीनगरमधील रिक्षाचालकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

SCROLL FOR NEXT