Ghati Hospital  sakal
छत्रपती संभाजीनगर

Birth Death Certificate : जन्म, मृत्यू प्रमाणपत्र हवे, मग पाच महिने थांबा! तब्बल पाच हजार प्रमाणपत्र पेंडिंग

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यास पाच महिन्यांचा अवधी दिला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यास पाच महिन्यांचा अवधी दिला जात आहे. आजघडीला तब्बल पाच हजार जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र प्रशासनाकडे पेंडिंग असल्याची बाब समोर आली.

मागील काही वर्षांपासून घाटीत जन्मलेल्या बाळाचे जन्म तर मृत्यू झालेल्यांचे मृत्यू प्रमाणपत्र दिले जातात. रुग्णालयातील या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागात केवळ तीन कर्मचारी आणि एकच संगणक असल्याने, अर्ज केल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी प्रमाणपत्र मिळेल असे संबंधिताला सांगितले जात आहे.

परंतु, रुग्णालयात संपूर्ण मराठवाड्यातून लोक येत असल्याने त्यांना पाच महिने थांबणे म्हणजे अडचणींचे ठरते. त्यात या प्रमाणपत्रामुळे त्यांची अनेक कामे रखडलेली असतात. किमान बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांना तरी तातडीने प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आजवर पाच हजार जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र पेंडिंग असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सहा डिसेंबरची तारीख

जन्म प्रमाणपत्रासाठी २२ जुलैला अर्ज केलेल्या व्यक्तीला प्रमाणपत्र मिळण्यासाठी सहा डिसेंबरची तारीख देण्यात आली असल्याचे दिसून आले. यावर या व्यक्तीलादेखील आश्चर्य वाटले.

अधिष्ठातांनी घातले लक्ष

रुग्णांच्या तक्रारी येत असल्याने, यात आता अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनीही लक्ष घातले आहे. आता ते स्वत: बसून कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणार आहेत. पेंडन्सी कमी करण्याला प्राधान्य दिले जाणार आहेत.

येथे स्टाफ कमी आहे, साइट स्लो झाल्याने एका प्रमाणपत्राला पंधरा मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत आहे. आता स्टाफ वाढवला आहे. दोन स्कॅनर, लॅपटॉपही दिले आहेत. मागे पंधरा दिवस साइटदेखील बंद होती. पेंडन्सी कमी करण्याचा प्रयत्न आहे.

- डॉ. सुरेश हरबडे वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT