Assembly Election 2024 BJP sakal
छत्रपती संभाजीनगर

Assembly Election 2024 : आधीच भार, त्यात ४० समित्यांची भर...तिन्ही मतदारसंघांत भाजपची यंत्रणा तयार

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे पक्षाकडून सतत दिले जाणारे कार्यक्रम आणि कामे यांनी हैराण झालेल्या शहरातील भाजप कार्यकर्त्यांवर विधानसभा निवडणुकीमुळे आणखी भार टाकण्यात आला. नियोजनाचा भाग म्हणून तब्बल ४० समित्या तयार करण्यात आल्या. निवडणुकीच्या रणधुमाळीत या अतिरिक्त भारामुळे सामान्य कार्यकर्ते वैतागले आहेत.

शिस्तबद्धता, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सतत व्यस्त ठेवण्याची भाजपची यंत्रणा आहे. मागील १० वर्षांत याच यंत्रणेच्या जोरावर भाजपने चांगली कामगिरी केली असली, तरी वर्षभर सतत काही ना काही काम आणि कार्यक्रम सोपविले जात असल्याने कार्यकर्ते व पदाधिकारीही हैराण झाले. नोकरी, कामधंदे सांभाळून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची विशेषतः महिला कार्यकर्त्यांची या पॅटर्नमुळे चांगलीच अडचण होत आहे. ना घरची कामे, मुलांची शाळा, कॉलेज, नातेवाइकांचे कार्यक्रम, स्वतःचा पोटापाण्याचा व्यवसाय, कुटुंबाकडे लक्ष देत पक्षाची कामे करावी लागतात.

ज्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सशक्त असतात, त्या पक्षाचे त्या प्रभागात प्राबल्य पाहायला मिळते. भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते सततचे कार्यक्रम, पक्षाकडून दिले जाणारे उद्दिष्ट, याव्यतिरिक्त काही विशेष जबाबदारी यामुळे अक्षरशः त्रस्त झाले आहेत. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील कार्यकर्त्यांना पंधरा दिवसांचा कार्यक्रम राबविण्यास सांगितले होते.

त्यात विधानसभेच्या तोंडावर तीनही विधानसभा मतदारसंघांतर्गत साठ पदाधिकाऱ्यांची तिन्ही मतदारसंघांत प्रत्येकी एक समिती गठित करण्यात आली. त्यांना विविध कामांची जबाबदारीही देण्यात आली. यावर आणखी एक जिल्हा पातळीवर ८० ते ९० पदाधिकारी, कार्यकर्त्यांची समिती तयार करण्यात आली. अशा एकूण ४० समित्या आहेत, त्यांच्यामार्फत या काळातील निवास, प्रचार, कॉर्नर बैठका, जाहीर सभा, जाहीरनामा, लाभार्थींशी संवाद अशी कामे केली जाणार आहेत.

या समित्या म्हणजे भार नाही. हे नियमित काम आहे. ज्यांना ज्या समितीची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांना ती जबाबदारी पाळायची आहे. हे काही रोजचे काम नाही. निवडणूक लढविताना महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षांना काम करावे लागणार आहे. त्यामुळे तीनही मतदारसंघांत भाजप पदाधिकाऱ्यांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या.

— शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष, भाजप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : पेजरचे स्फोट होतात, मग EVM कसे हॅक होणार नाहीत... निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा झटका! निवडणूक आयोगाने फेटाळली चिन्हाबाबातची मोठी मागणी

Savner Assembly Elections 2024: रामटेक वगळता ग्रामीणमधून ‘लिफाफे' बंद; भाजपाचा नवा पॅटर्न !

By-Elections 2024: 15 राज्यांमधील 48 विधानसभा आणि 2 संसदीय मतदारसंघांसाठी पोटनिवडणुका जाहीर, जाणून घ्या वेळापत्रक

खेळाडूला गालावर जाळ काढला! बांगलादेशचे प्रशिक्षक Chandika Hathurusingha ची तडकाफडकी हकालपट्टी

SCROLL FOR NEXT