भाजप 
छत्रपती संभाजीनगर

भाजपची 'जनआशीर्वाद यात्रा' परळीतून होणार सुरु, जोरदार तयारी

प्रकाश बनकर

औरंगाबाद : राज्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या चार मंत्र्यांतर्फे त्यांच्या विभागातील पाच मतदारसंघात सोमवारपासून (ता.१६) जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) काढण्यात येणार आहे. मराठवाड्यातील (Marathwada) जनआशीर्वाद यात्रा ही परळीपासून सुरू होणार आहे. २१ ऑगस्टला औरंगाबादेत (Aurangabad) समारोप होणार आहे. पाच जिल्ह्यांतील ३२ ठिकाणांवरून ही यात्रा जाणार आहे. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्यातर्फे यात्रेचे मार्ग जाहीर करण्यात आले. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Union Minister of State For Finance Bhagwat Karad) यांच्या नेतृत्वाखाली ही जनआशीर्वाद यात्रा परळी येथून सोमवारी (ता.१६) सकाळी आठ वाजता निघणार आहे. त्यानंतर गोपीनाथगडावर जात श्री. मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत ही यात्रा पुढे घेऊन जाणार आहे. पहिल्या दिवशी ही यात्रा गंगाखेड, पालम, लोहा येथून नांदेड (Nanded) येथे जाणार आहे.

मंगळवारी (ता.१७) नांदेड येथे सकाळी ९ वाजात जणार, तेथून अर्धापूर, कळमनुरी, हिंगोली येथे मुक्कामी, बुधवार (ता.१८) हिंगोली, जिंतूरहून परभणी येथे मुक्कामी, गुरुवारी (ता.१९) परभणी, मानवत, पार्थी, सेलू, परतूर, वाटूर, शुक्रवारी (ता.२०) जालना, बदनापूर, शेकटा, करमाड, चिकलठाणा, औरंगाबादेत दाखल होणार. यासह शनिवारी (ता.२१) औरंगाबाद, दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ, हतनूर आणि कन्नड येथे जनआशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT