औरंगाबाद विमानतळावर डिस्पॅच चित्रपटाचा शूटिंगचा सेट सकाळ
छत्रपती संभाजीनगर

बॉलिवूडलाही पडली औरंगाबादची भुरळ! २० ते ३० दिवसांचे चित्रीकरण

सुनील इंगळे

औरंगाबाद : महानगरांमध्ये कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव तसेच शूटिंगला वेळेची येणारी बंधन यामुळे हिंदी, मराठी चित्रपट व वेबसिरीजच्या (Web Series) मोठमोठ्या बॅनरला ‘औरंगाबाद शहरा’ची (Bollywood Film Shooting In Aurangabad) भुरळ पडली आहे. वर्षभरात पाच चित्रपट व दोन वेबसिरीजचे चित्रीकरण जिल्ह्यात झाले. शिवाय येत्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये एक हिंदी व दोन मराठी चित्रपटांसह काही मोठ्या वेबसिरीजचे २० ते ३० दिवसांचे चित्रीकरण जिल्ह्याच्या (Aurangabad) विविध ठिकाणी होणार आहे.जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटनस्थळे तसेच त्यात भर घालणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे हिंदी, मराठी चित्रपटासह (Marathi Web Series) वेबसिरीजचे प्रोडक्शन हाऊस येथे शूटिंगसाठी सेट लावत आहेत. शहरात शुक्रवारी (ता. ३०) ज्येष्ठ अभिनेते मनोज वाजपेयी (Actor Manoj Vajpai) यांच्या काही दृश्‍यांचे चित्रीकरण झाले. यात केवळ दहा तासांसाठी तीस लाखांचा खर्च आला. यातून स्थानिकांनाही रोजगार मिळाला. भविष्यात असे अनेक चित्रपटांचे जिल्ह्यात चित्रीकरण होणार असल्याचे एट अवर्सचे संचालक किशोर निकम यांनी सांगितले. यासाठी औद्योगिक, सामाजिक संस्था, स्थानिक कलावंत, शासकीय अधिकारी, नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. (bollywood prefer aurangabad for web series or films shooting glp88)

तुमच्या लाईकसाठी बसतो मोठा फटका

एखाद्या चित्रपटाचे शूटिंगचे काम पूर्ण तसेच चित्रपट रिलीज होईपर्यंत चित्रपटासंदर्भातील माहिती अत्यंत गोपनीय ठेवण्यात येते. परंतु, शूटिंगसाठी आलेले अभिनेत्यांचे फोटो स्थानिक नागरिक काढून फेसबुक व इतर समाजमाध्यमांवर शेअर करतात. त्यांच्या या फोटोच्या दहा लाइकमुळे चित्रपटाच्या शूटिंगची माहिती सर्वत्र पसरते आणि चित्रपट रिलीज होण्याआधीच चर्चेत येतो. यामुळे चित्रपट प्रोडक्शन हाऊसला याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे स्थानिक नागरिक व कलावंतांनी चित्रपट शूटिंगचे चित्रफीत व फोटो काढणे टाळावेत.

चित्रीकरणाची ठिकाणे

राज्याची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. यात जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, पाणचक्की, दौलताबाद किल्ला, दौलताबादचा घाट, खुलताबाद, चारोळा तसेच शहरातील जुने वाडे, मंदिर, मशीद, चर्च, जुने शासकीय कार्यालयाच्या इमारती अशा ठिकाणी आतापर्यंत डझनभराहून अधिक चित्रपटांचे शूटिंग झाले. भविष्यातही होणार आहे.

यापूर्वी झाले शूटिंग

बॉलिवूडची ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मीना कुमारी यांचा ‘पाकिजा’, ‘बुरा आदमी’- प्राण, ‘लाडला’ चित्रपटाची शूटिंग व्हिडिओकॉन कंपनीत झाली होती. ‘एम. एस. धोनी दी अनटोल्ड स्टोरी’साठी सुशांतसिंह राजपूत यांची शूटिंग औरंगाबाद लेणी तर चाईना देशातील चाईनीच चित्रपटाची अजिंठा, वेरूळ लेणीला १५ दिवस शूटिंग झाली. वर्षभरात ‘जून’ हा मराठी चित्रपट औरंगाबाद लेणी, ‘रे’ या वेबसिरीजचे शूटिंग हे वेरूळ लेणी, छावणीचे चर्च, स्मशानभूमी येथे करण्यात आली; तसेच शहराच्या विविध ठिकाणी विविध वस्तू, बॅंकांच्या जाहिरातीचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

चित्रपटाच्या शूटिंगसाठी लागणारा सेटअप हा खूप मोठा असतो. परंतु, कोरोनामुळे तो सर्वत्र घेऊन फिरणे शक्य नाही. मुंबई, पुण्यावरून आणण्यापेक्षा स्थानिक पातळीवरच शूटिंगसाठी व्यवस्था उपलब्ध झाली तर प्रोडक्शन हाऊस व स्थानिकांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे शहरात स्थानिक पातळीवर असे सेटअप तयार करण्याची गरज आहे. यात ज्युनिअर आर्टिस्ट, टेक्निशियन टीम, लोकेशन टीम, असिस्टंट डायरेक्टर, आर्ट डायरेक्टर, कॅमेरा मेन, त्यासोबत साहित्य, हॉटेल, ट्रॅव्हल, लाईट, क्रेन, जनरेटर, ट्रॉली, केटरर्सची व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.

- किशोर निकम, संचालक, एट अवर्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT