Board Exam sakal
छत्रपती संभाजीनगर

Board Exam : मागण्‍यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार ; बोर्डाकडून मान्यता रद्द करण्याची धमकी

दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे अनेक शिक्षक उत्तरपत्रिका न तपासता बोर्डाकडे पाठवीत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक, प्राचार्यांनी दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकेचे पार्सल ताब्यात न घेता मंडळाकडे पाठविल्यास त्यावरील खर्च संबंधित शाळा, महाविद्यालयांकडून वसूल करण्यात येईल.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे अनेक शिक्षक उत्तरपत्रिका न तपासता बोर्डाकडे पाठवीत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापक, प्राचार्यांनी दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकेचे पार्सल ताब्यात न घेता मंडळाकडे पाठविल्यास त्यावरील खर्च संबंधित शाळा, महाविद्यालयांकडून वसूल करण्यात येईल. तसेच त्या शाळा, विद्यालयांची मंडळ मान्यतादेखील रद्द करण्यात येईल, असा इशारा बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिला.

शिक्षण मंडळाच्यावतीने २१ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा, तर एक मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जात आहे. यंदा विभागातील जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली अशा पाच जिल्ह्यांतून बारावीसाठी एक लाख ७९ हजार १४, तर दहावीसाठी १ लाख ८६ हजार ८१४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. प्रत्येक दिवशीचा पेपर संपल्यानंतर साधारणपणे तीन दिवसांनंतर संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकांचे पार्सल शाळा स्तरावर ईपीपीद्वारे मुख्याध्यापक, प्राचार्यांना प्राप्त होणार आहे.

वेळेत निकाल लावण्यासाठी संबंधित शिक्षकांनी उत्तरपत्रिका मुदतीत तपासून देणे आवश्यक आहे. मात्र, प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाने दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तापसणीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे उत्तरपत्रिका न तपासताच बोर्डाकडे पाठविण्यात येत आहेत. यावर बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी पत्र जारी केले आहे की, जर मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय उत्तरपत्रिका न स्वीकारता परत पाठविल्यास मंडळाच्या शिक्षासूचीनुसार संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची मंडळ मान्यता रद्द करून संबंधित शाळेचा निकाल राखीव ठेवला जाईल. तसेच उत्तरपत्रिकेचे पार्सल ताब्यात न घेता मंडळाकडे पाठविल्यास त्यावर झालेला सर्व खर्च संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडून वसूल करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना विभागीय मंडळाचे अध्यक्ष साबळे यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.

शिक्षक समन्वय संघाचे निवेदन

छत्रपती संभाजीनगर : एक जानेवारीपासून पुढील टप्पावाढ मिळेपर्यंत अंशतः अनुदानित शिक्षक तथा प्राध्यापकांनी इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. याबाबतचे निवेदन बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच जिल्हाधिकाऱ्‍यांना शिक्षक समन्वय संघातर्फे देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, तीन जानेवारीपासून आझाद मैदानावर अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना अनुदानाचा पुढील टप्पा या मागणीसह इतर मागण्यांसंदर्भात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. याची शासन स्तरावर कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येत आहे.निवेदनावर शिवराम म्हस्के, संतोष जाधव, सय्यद जमील, प्रा. संजय चव्हाण, सतीश जाधवर, पी.ए. पारवे, पी.बी. झावरे, एस.ए. टुपके, एम.डी. हिवाळे, वैभव चव्हाण, प्रा. सुहास सोळंके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Beed Voter Assembly Polls : तीन हजार मतदारांची एकाही उमेदवाराला पसंती नाही

IND vs AUS 1st Test: नाद खुळा... जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

SCROLL FOR NEXT