sambhaji sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : बॉयफ्रेंड भोवला ११ लाखाला!

सोशल मीडीयावर ओळखीतून सलगी प्रेमाचे नाटक करून करायचा ब्लॅकमेल

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर ; फेसबुकवर ऑनलाइन ओळख झाली, हळूहळू संपर्क वाढत तिच्या घरापर्यंतही पोचला. इतकेच नव्हे, तर प्रेमाचे नाटक करुन तिच्यावर अत्याचार केला. तिचे अश्लील फोटो व्हायरल करायची धमकी देत तिच्याच जीवावर नवी कोरी कार, आयफोन आणि वेळोवेळी लागतील तितके पैसे घेत तब्बल ११ लाख उकळले! त्यानंतर त्याने तिला अश्लील फोटो व्हायरल करण्याच्या नावाखाली पुन्हा पैसे मागणे सुरु केले. तिच्या पतीला ही बाब समजल्यानंतर त्याने नातेवाईकांच्या मदतीने समजाविण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र पीडितेच्या पतीलाच त्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार २०१९ पासून गारखेड्यात घडत होता. यानंतर वैतागलेल्या पीडितेच्या नातेवाईकांनी त्याचे अपहरण करून बेदम मारहाण केली.

सौरव चंद्रभूषण दंडीमे (२८, रा. एन-२, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी २८ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती गारखेड्यात राहते. तिच्या पतीची स्वतःची कंपनी आहे. तिची १० एप्रिल २०१९ ला आरोपी सौरवसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. त्यांचे एकमेकांसोबत बोलणे होत असे, चांगली ओळख झाल्यानंतर त्याने तिच्याशी अश्लील बोलणे सुरु केल्याने तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्याने पुन्हा इन्स्टाग्रामवर तिला विनंती पाठविली आणि बोलणे सुरु केले.

दरम्यान, सौरवने पीडितेला विश्वासात घेत प्रेमाचे नाटक केले. दोघांमध्ये चांगली ओळख होऊन प्रेम निर्माण झाल्याने तीही त्याच्यासोबत फिरायला जात असे. तिने त्याच्या वाढदिवसाला २३ एप्रिल २०१९ ला ३६ हजारांची अंगठी घेतली. पीडितेचा पती कंपनीत गेला, की आरोपी पीडितेच्या घरी येत असे, दरम्यान त्याने तिचे नग्नावस्थेत फोटो काढले. याची माहिती पीडितेला नव्हती. याचा गैरफायदा तो घेत राहिला.

पतीलाही केली मारहाण

ऑक्टोबर २०२२ मध्ये हा प्रकार पीडितेच्या पतीला समजल्यानंतर त्याने आरोपी सौरवच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांच्यासमक्ष त्याला समजावून सांगितले असता, त्याने सर्वांसमोर त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यानंतर नऊ डिसेंबर २०२३ ला पीडितेने हा प्रकार तिच्या वडीलांना सांगितला असता तिच्या वडीलांनी १० डिसेंबरला तिला घेऊन आरोपीचे घर गाठले. त्याच्या आईवडिलांना इतर सर्व नातेवाईकांसमक्ष समजावून सांगतले. विशेष म्हणजे, त्याच्या आईवडिलांनीही ‘तुमचे सर्व पैसे परत करतो, तसेच यानंतर तुम्हाला काही त्रास होणार नाही’ असे लिहून दिले. त्यानंतरही सौरव कुकृत्य करीतच राहिला. त्यामुळे पीडिता हतबल झाली होती.

तिच्याच जीवावर नवी कोरी कार, आयफोन

आरोपी सौरवने तिला धमकावत ऑगस्ट २०२२ मध्ये २२ हजार रुपये रोख घेतले. त्यानंतर कार घेण्यासाठी डाऊन पेमेंट म्हणून तीने मंगळसूत्र, मुलांची चेन, अंगठ्या मोडून दोन लाख रुपये दिले. कारच्या नंबरसाठी आणि सीट कव्हरसाठी ५० हजार घेतले. त्यानंतर पीडितेने त्याला माझे फोटो, व्हिडीओ मला परत कर म्हणाली असता, त्याने पुन्हा तिच्याकडून एकदा ५० हजार, २३ हजार रोख घेतले. पुन्हा धमकी दिल्याने तिने भितीपोटी त्याच्या कारचे हप्ते भरण्यासाठी चार लाख ८० हजारांच्या आठ तोळ्यांच्या दोन सोन्याच्‍या बांगड्या दिल्या. त्यानंतर त्याने आयफोन १५ प्रो मॅक्स घेण्यासाठी दोन लाख ४० हजारांचे चार तोळे सोन्याचा नेकलेस, कानातले आणि ६५ हजार रुपये रोख दिले.

`माझा सुखाचा संसार मोडू नको`

आरोपी सौरव हा वारंवार तिच्या घरी येऊ लागला होता, एक दिवस तिने माझ्या पतीच्या स्वतःच्या कंपन्या आहेत. मला मुलंबाळं आहेत. तू माझा सुखी संसार मोडू नको म्हणून त्याला विणवले. मात्र, त्याने तिचे काढलेले आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ तिला दाखवत मी सांगेल तसे वागली नाहीस तर हे सर्व तुझ्या पतीला पाठवेन, अशी धमकी दिली. तू माझे काहीच करु शकत नाही, असे म्हणत तो नेहमीच तिच्या घरी जाऊन अत्याचार करत असे.

अत्याचार करणाऱ्याचे अपहरण करून नेत बदडले

अत्याचार प्रकरणातील आरोपीचे पीडित तरुणीच्या पतीसह तिच्या भाऊ, वडिलांनी इतर लोकांच्या मदतीने अपहरण केले. त्याला विविध ठिकाणी नेत बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला एका बंद खोलीत नेण्यात आले, तिथे त्याला मारहाण करताना लोकांनी त्याचे व्हिडिओ बनविले. तसेच एकाने चाकू दाखवत तुला आणि तुझ्या कुटूंबाला संपवून टाकतो म्हणत धमकी दिली. इतकेच नव्हे, तर आरोपीचे आधार कार्ड, पॅन कार्डचे झेरॉक्स आणून कोऱ्या बॉन्डपेपरवर त्याच्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे सौरवने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

विशेष म्हणजे, त्याला बेदम मारहाण करताना तो ओरडत असताना तोंड दाबून मारले, दरम्यान, त्याच्या कपड्यावर रक्त पडल्याने त्याला दुसरे कपडे घालून सोडून दिले. आरोपी सौरव याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन पीडितेचे पती, भाऊ, वडिलांसह इतर सात ते आठ जणांविरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक आत्माराम घुगे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT