औरंगाबाद : प्रियकराचा दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने खून sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : प्रियकराचा दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने खून

चाकूर तालुक्यातील घटना, महिलेसह तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

चाकूर : पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचे दोन व्यक्तींशी अनैतिक संबंध होते. दोघांपैकी एकाने तिच्यावर देहविक्रय व्यवसायासाठी दबाव आणला. त्यासाठी तो तिला वेळोवेळी मारहाणही करीत होता. त्यामुळे महिलेने दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने त्रास देणाऱ्या प्रियकराचा खून केल्याची घटना सोमवारी (ता. १३) मोहदळ-आष्टा शिवारात घडली. पोलिसांनी आज तिघांना अटक केली.

मोहदळ-आष्टा शिवार स्त्यावर सोमवारी हणमंत येरवे (वय ४०) यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाशेजारी लोखंडी रॉड, मिरची पावडर आणि दोरी पोलिसांना सापडली होती.

सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी पाहणी केली. तपासादरम्यान येरवे यांचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे कळाले.

पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले असता येरवे हा देहविक्रय व्यवसाय करण्यास भाग पाडत होता, मारहाण करीत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून ओळखीतील दोन व्यक्तींच्या मदतीने रविवारी (ता. १२) रात्री आठच्या सुमारास मोहदळ-आष्टा शिवारात निर्जन ठिकाणी बोलावून त्याचा खून केल्याची कबुली दिली. त्या आधारे पोलिसांनी संतोष धोंडीराम घाडगे (रा. शिवनखेड), लक्ष्मण बब्रुवान डांगे (रा. आष्टा) यांना ताब्यात घेतले. त्यांनीही खुनाची कबुली दिली. या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास

SCROLL FOR NEXT