Pharmacy Admission 2024 sakal
छत्रपती संभाजीनगर

Pharmacy Admissions 2024 : ‘बी.फार्मसी’, ‘एम.फार्म.’ प्रवेशनिश्‍चिती आजपासून

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ‘बी.फार्मसी’ आणि ‘एम.फार्म.’च्या प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची पहिल्या प्रवेशफेरीसाठी तात्पुरते जागावाटप गुरुवारी (ता. दहा) जाहीर झाले. शुक्रवारी (ता. ११) प्रत्यक्ष प्रवेशाला सुरवात होईल. १४ ऑक्टोबरला सायंकाळी पाचपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्‍चितीसाठी मुदत देण्यात आली. बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेशफेरीसाठी प्रवर्गनिहाय जागांची यादी शुक्रवारी (ता. ११) जाहीर होणार आहे.

‘बी.फार्मसी’च्या अंतिम गुणवत्ता यादीत ४७ हजार ८०४ जणांचा, तर ‘एम.फार्म.’च्या अंतिम गुणवत्ता यादीत ११ हजार २९४ जणांचा, तर डिप्लोमा इन फार्मसीच्या अंतरिम गुणवत्ता यादीत ३५ हजार ५१९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ‘बी.फार्मसी’ आणि ‘एम.फार्म.’च्या दुसऱ्या फेरीसाठी अंतरिम रिक्त जागांची यादी १५ ऑक्टोबरला जाहीर होईल. विद्यार्थ्यांच्या लॉगिनमधून ऑप्शन फॉर्मचे ऑनलाइन सबमिशन आणि कन्फर्मेशन १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान करावे लागणार आहे.

अंतरिम जागावाटप २१ ऑक्टोबरला जाहीर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना वाटप झालेल्या जागेसाठी स्वीकृती भरावी लागणार आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत जागा स्वीकृती आणि आक्षेप या काळात नोंदविता येतील. तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी २५ ऑक्टोबरला जाहीर होईल. ऑप्शन फॉर्मचे ऑनलाइन सबमिशन आणि कन्फर्मेशनसाठी २६ ते २८ ऑक्टोबरची वेळ देण्यात आली. ३० ऑक्टोबरला जागावाटप जाहीर होईल. ४ ते ६ नोव्हेंबरला जागांची स्वीकृती करावी लागेल. त्यानंतर संस्था स्तरावरील प्रवेश होतील. १४ नोव्हेंबर प्रवेशाची कटऑफ डेट आहे.

डी.फार्मसीचे जागावाटप

डी.फार्मसीच्या जागांची रचना शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर १२ ते १४ विद्यार्थ्यांना ऑनलाइन विकल्प भरून त्यास निश्‍चितीसाठी वेळ देण्यात आला. १६ ऑक्टोबरला तात्पुरते जागावाटप तंत्रशिक्षण संचालनालयाकडून निश्‍चित होईल. १७ ते २० ऑक्टोबरदरम्यान वाटप जागेची निश्‍चिती करून आवश्‍यक कागदपत्रांसह शुल्क भरून प्रवेशनिश्‍चिती करावी लागणार आहे. २१ ऑक्टोबरला रिक्त जागानिश्‍चिती, २१ ते २३ पसंतीक्रम भरणे, २५ ऑक्टोबर जागावाटप जाहीर होईल. त्यानंतर २६ ते ३० ऑक्टोबर स्वीकृती करून प्रवेशनिश्‍चिती करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray: एकनाथ शिंदेंचा त्याग; अमित ठाकरेंसाठी शिवसेना 'हा' मतदारसंघ सोडणार

Latest Marathi News Live Updates: दामोदर शिंगडांचे पुत्र सचिन शिंगडा करणार मनसेत प्रवेश

Kajol Angry At Paparazi : "चप्पल काढून मंडपात या" ; पापाराझींवर काजोल भडकली, म्हणाली....

Noel Tata Net Worth: रतन टाटांचा मौल्यवान वारसा नोएल टाटांच्या खांद्यावर; किती आहे संपत्ती?

DSP Mohammed Siraj: 'दबंग' मोहम्मद सिराज; पोलीस उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला

SCROLL FOR NEXT