Celebrating anniversary of Marathwada Sakal edition Sakal
छत्रपती संभाजीनगर

‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव!

मराठवाडा आवृत्तीचा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - सुंदर रांगोळी, रोषणाईने सजलेला संत एकनाथ रंगमंदिराच्या परिसरातील मंडप हळूहळू गर्दीने फुलला आणि ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव झाला. विचारांची अदानप्रदान करीत रंगलेल्या स्नेहमेळाव्यात ‘सकाळ’च्या विविध सामाजिक उपक्रमांसह आज प्रसिद्ध केलेल्या ‘समृद्धीकडे मराठवाडा’ या बहुरंगी, बहुपानी विशेष पुरवणीचे भरभरून कौतुक झाले. शाहीर नंदेश उमप यांनी सांगीतिक कार्यक्रमातून उलगडलेल्या ‘लोकरंगा’त गर्दीतील प्रत्येक जण रमून गेला.

निमित्त होते ते ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीच्या २३ व्या वर्धापनदिनाचे. जूनच्या पहिल्या दिवशी येणारा ‘सकाळ’चा वर्धापनदिन ही सर्वांसाठी एक पर्वणी असते. त्यानुसार आजही ती सर्वंनी साधली. स्नेहमेळावा, मोबाइल, दूरध्वनी, व्हॉट्सॲपद्वारे सकाळपासून शुभेच्छांचा वर्षाव होत होता. विविध कार्यक्रमांसाठी सायंकाळी पाचपासून औरंगाबादकरांची पावले संत एकनाथ रंगमंदिराकडे वळली आणि हा हा म्हणता तेथील मंडप गर्दीने व्यापून गेला.

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग, व्यापार, राजकीय आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह वाचक, जाहिरातदार, हिंतचिंतकांचा समावेश होता. या सर्व मान्यवरांच्या साक्षीने स्नेहमेळावा रंगला आणि ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक श्रीराम पवार, चीफ मार्केटिंग ऑफिसर नवल तोष्णीवाल, मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने, सरव्यवस्थापक उमेश पिंगळे, चीफ मॅनेजर अनिकेत गोरे यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ‘सकाळ’ कार्यालयात येऊन शुभेच्छा दिल्या. वर्धापनदिन सोहळ्यात महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले, खासदार इम्तियाज जलील, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, नारायण कुचे, प्रशांत बंब, हरिभाऊ बागडे, उदयसिंग राजपूत, सतीश चव्हाण, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, म्हाडाचे सीईओ अण्णासाहेब शिंदे, क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त जगदीश तांबे, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार, सहसंचालक औद्योगिक सेवा व आरोग्य राम दहिफळे, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत, शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख, उपशिक्षणाधिकारी सचिन सोळंकी, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष नितीन बगाडिया, अजित सीड्‍सचे व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे, एमआयटीचे संचालक डॉ. संतोष भोसले, मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपजिल्हाधिकारी भारत कदम, बॅंकिंग तज्ज्ञ देविदास तुळजापूरकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जैस्वाल, बाजार समितीचे प्रशासक जगन्नाथ काळे, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, कर्करोग रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गायकवाड, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मीनाताई शेळके, देवयानी डोणगावकर, राजेश सरकटे, एमजीएमचे अधिष्ठाता प्रवीण सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, ॲड. सिद्धेश्‍वर ठोंबरे उपस्थित होते. दरम्यान, विशेष पोलिस महानिरीक्षक एम. एम. प्रसन्ना आणि पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी विशेष शुभेच्छा संदेश दिला.

कर्तृत्ववानांना सलाम

वेगळे काहीतरी करून समाजात आगळा ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववानांचा ‘सकाळ’च्या वर्धापनदिनी गौरव करण्याची परंपरा आहे. त्यानुसार मराठवाड्यातील सात कर्तृत्ववानांचा महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, मुख्य संपादक पवार, निवासी संपादक माने यांच्या हस्ते सत्कार झाला. सत्कारार्थी असेः नामदेव आणेराव, ऋषीकेश डोणगावकर (स्टार्टअप), जय उपासे (ऊर्मी आश्रम), गणेश घुले (बालसाहित्यिक), डॉ. वासंती चव्हाण (उत्तम आरोग्यसेवा), डॉ. प्रतिभा श्रीपत (आरोग्य, पर्यावरण जागृती), सारिका जैन (जि. प. शाळेतील मुलींसाठी उल्लेखनीय कार्य).

संगीतमय कार्यक्रमाची मेजवानी

लोकशाहीर नंदेश उमप आणि त्यांच्या टीमने रात्री ‘लोकरंग’ उलगडत ‘गझल ते गोंधळ’ हा बहारदार कार्यक्रम सादर केला. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. डॉ. समीरा गुजर जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT