chhatrapati sambhajinagar traffic changes over ashadhi ekadashi sakal
छत्रपती संभाजीनगर

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीनिमित्त वाळूज पंढरपूरकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत बदल

chhatrapati sambhajinagar traffic changes over ashadhi ekadashi : कादशीनिमित्त वाळूज पंढरपूरकडे जाणाऱ्या व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. यावेळी बंद असलेले मार्ग आणि पर्यायी मार्ग...

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील छोट्या पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे. या ठिकाणी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. जिल्हाभरातून दिंड्या येतात. यंदा बुधवारी (ता. १७) आषाढी एकादशी असून, एकादशीनिमित्त वाळूज पंढरपूरकडे जाणाऱ्या व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. यावेळी बंद असलेले मार्ग आणि पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत.

छोटे पंढरपूर परिसरात आजूबाजूच्या गावांतील व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शन व यात्रेसाठी येतात. येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर राज्य महामार्गाला लागून आहे.

या ठिकाणी आषाढीला सुमारे १५०-२०० लहान-मोठ्या दिंड्या येतात; तसेच तेथे राज्य महामार्ग रोडच्या दोन्ही बाजूला यात्रेनिमित्त छोटे विक्रेते आपली दुकाने लावतात. या दिवशी परिसरात भाविक व वाहनांची मोठ्या संख्येने वर्दळ निर्माण होते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी मार्गात बदल करण्यात आले.

हे बंद मार्ग

  • एएस क्लब चौक ते कामगार चौकापर्यंतचा रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल.

  • ओएसिस चौक ते आंबेडकर चौक रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे.

  • या महामार्गावरील नगर नाका ते एएस क्लब चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे.

हे आहेत पर्यायी मार्ग

  • जालना/बीडकडून अहमदनगर-पुण्याकडे जाणारी अवजड वाहने ही महानुभव आश्रम चौक, लिंक रोड टी-राष्ट्रीय महामार्ग (नवीन सोलापूर-धुळे हायवे) मार्गे साजापूर फाटा, एनआरबी चौक, एफडीसी कॉर्नर, कामगार चौकमार्गे जातील.

  • जालना/बीडकडून अहमदनगर-पुण्याकडे जाणारी हलकी वाहने ही नगर नाका, मिटमिटा, तीसगाव चौफुली, बडगाव कोल्हाटी, सारा सार्थक, शनी मंदिर, कार्तिक हॉटेल, रांजणगाव फाटा, एफडीसी कॉर्नर, कामगार चौकमार्गे जातील.

  • जालना/बीड/जळगावकडून धुळे/नाशिककडे जाणारी वाहने लिंक रोड किंवा वाल्मी नाका, राष्ट्रीय महामार्ग (नवीन सोलापूर-धुळे हायवे) या मार्गाने जातील व येतील.

  • छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने ही नगर नाका, मिटमिटा, तीसगाव चौफुली, वडगाव कोल्हाटी, महाराणा प्रताप चौक, एफडीसी कॉर्नर, कामगार चौकमार्गे जातील किंवा साजापूर गावातून एनआरबी चौक रांजणगाव-एफडीसी कॉर्नर-कामगार चौकमार्गे पुढे जातील.

  • पुणे-अहमदनगरकडून जालना-बीडकडे जाणारी अवजड वाहने ही इसारवाडी, बिडकीनमार्गे पुढे जातील व येतील.

  • पुणे-अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगर शहरात येणारी हलकी वाहने ही पाटोदा टी, संताजी चौकी, वाल्मी नाका, महानुभव चौकमार्गे पुढे जातील.

  • पुणे-अहमदनगरकडून धुळे-नाशिककडे जाणारी हलकी वाहने ही पाटोदा टी, संताजी चौकी, वाल्मी नाकामार्गे राष्ट्रीय महामार्ग (नवीन सोलापूर-धुळे हायवे) मार्गे पुढे जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT