sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : पठ्ठ्याने चोरले जेसीबी, ट्रॅक्टर अन् आलिशान कार!

पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवली होती एक कोटी १२ लाखांची वाहने

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - यात्रेतील खेळणी खरेदी करावी अन् ती एका रांगेत मांडावी असा महागड्या वाहन चोरीचा प्रकार कन्नड तालुक्यातील कुंजखेडा गावात उघडकीस आला. दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर, टाटा सफारी, महिंद्रा कार, दोन क्रेटा, एक बोलेरो पिकअप, बुलेट आणि इतर दुचाकी अशी तब्बल एक कोटी १२ लाख रुपयांची १२ महागडी वाहने चोरी करणाऱ्यास ग्रामीण पोलिसांच्या कन्नड आणि स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. इब्राहिम अमीन पटेल (रा. भाट अंतरवली, ता. गेवराई, जि. बीड, सध्या रा. कुंजखेडा ता. कन्नड) असे त्या अटकेतील आरोपीचे नाव आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी २२ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.

अधीक्षक कलवानिया यांना कुंजखेडा येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये ही वाहने लावून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून एलसीबी आणि कन्नड पोलिसांच्या पथकाने छापा मारून वाहने जप्त केली. या प्रकरणात वाहनांचे चेसीस क्रमांक खाडोखोड केल्याने सुरवातीला कलम ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.

वाहने चोरतो अन् बेवारस स्थितीत लावतो

आरोपी पटेलने अनेक ठिकाणाहून वाहने चोरी केली आहेत. महत्त्वाचे म्हणजे जेसीबी, ट्रॅक्टरसारखी वाहने चोरल्यानंतर कोणाला सापडू नये अशा ठिकाणी पार्क करून ठेवतो. त्याला अटक केल्यानंतर त्याने बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी आपण वाहने पार्क करून ठेवल्याचे सांगितले, त्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी जात ती वाहने जप्त करून टीव्ही सेंटर भागातील अधीक्षक कार्यालयात आणली. ही कारवाई अधीक्षक कलवानिया, अपर अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली एससीबी निरीक्षक सतीष वाघ, उपनिरीक्षक मधुकर मोरे, कासम पटेल, भागिनाथ आहेर, रवी लोखंडे, विठ्ठल डोके, गोपाल पाटील, दीपक सुरोशे, आनंद घाटेश्वर, राहुल गायकवाड, योगेश तरमाळे, जीवन घोलप, जनाबाई चव्हाण, कविता पवार, संतोष डमाळे यांनी केली.

परराज्यातील वाहनांचा समावेश

जप्त केलेल्या वाहनांमध्ये दिल्लीसह पंजाब राज्याची पासिंग असलेल्या महागड्या कारही आहेत. याशिवाय जप्त केलेल्या अनेक वाहनांचे चेसीस क्रमांकांत खाडाखोड केली आहे. त्यापैकी एका वाहनाची आरटीओ नोंदणी हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत दिसून येत असल्याने राज्याबाहेर या आरोपीचे ‘कनेक्शन’ आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT