godavari sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : गोदामाई खळाळली; १७ गावांना इशारा

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर - गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरून ''ओव्हरफ्लो'' झाली. या धरणातील अतिरिक्त पाणी गोदापात्रातात सोडल्याने गोदामाई खळखळून वाहत असून सध्या निफाड तालुक्यातील नांदूर-मधमेश्वर पिकअप वेअरमधून गोदापात्रात १३ हजार ५०० क्युसेकने विसर्ग जायकवाडीच्या दिशेने सुरू आहे. यामुळे वैजापूर तालुक्यातील गोदाकाठच्या १७ गावांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी वाढवून पूर्ण क्षमतेने भरली आहेत. जिल्ह्यातील गंगापूरसह दारणा, पालखेड, कडवा ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे या धरणांतील अतिरिक्त पाणी नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमध्ये सोडण्यात आले आहे.

त्यानंतर वेअरमधून गोदापात्रात विसर्ग सोडण्यात आला. शनिवारी (ता.२३) सकाळी दहा वाजेच्या सुमारास १६ हजार ६५५ क्युसेकने विसर्ग गोदापात्रात विसर्ग सुरु होता. नंतर दुपारी ३ हजार १५५ क्युसेकने विसर्ग कमी करण्यात आल्याने सद्यःस्थितीत वेअरमधून १३ हजार ५०० क्युसेकने विसर्ग सुरू होता.

गोदापात्रात दीड लाख क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग सोडल्यास पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता असते. परंतु तरीही खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तालुक्यातील १७ गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, संपूर्ण पावसाळा संपत आल्यानंतर गोदामाई पहिल्यांदा खळाळल्याने गोदाकाठावर पानी बघण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

नाशिकमधील धरणांतील जलसाठा

गंगापूर - ९७ टक्के

कश्यपी - ८९ टक्के

पालखेड - ९७ टक्के

दारणा - ८८ टक्के

भावली - १०० टक्के

मुकणे - ८९ टक्के

वाकी- ८२ टक्के

भाम- १०० टक्के

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणांतील अतिरिक्त पाणी नांदूर-मधमेश्वर पिकअप वेअरमध्ये सोडून त्यानंतर गोदापात्रात सोडण्यात आले आहे. सध्यःस्थितीत गोदापात्रात १३ हजार ५०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

राकेश गुजरे,कार्यकारी अभियंता, नांमका, वैजापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT