sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : तब्बल १२ दिवस डोळे लागतात नळाकडे! महिन्यातून दोन ते तीनदाच मिळते पाणी

गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळीच्या महत्त्वाच्या सणांमध्ये तरी महापालिका प्रशासन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करेल,

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - ऐन सणासुदीच्या काळात शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही भागात नऊ तर काही भागात १२ दिवसांच्या अंतराने नळाला पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याचा गॅप वाढलेला असताना पाणी मात्र तेवढेच म्हणजे १२ दिवसांसाठी दीड ते दोन हजार लिटर एवढेच मिळते. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. महापालिका प्रशासनाकडून पाणीटंचाई संदर्भात उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील पाणीपुरवठ्याचा काही महिन्यांपासून बट्ट्याबोळ झाला आहे. कधी वीज पुरवठा खंडित झाल्याने तर कधी तांत्रिक कारणांमुळे तर अधूनमधून पाइपलाइन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळीच्या महत्त्वाच्या सणांमध्ये तरी महापालिका प्रशासन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी नागरिकांना अपेक्षा होती.

मात्र, ती फोल ठरली आहे. शहराच्या काही भागात सध्या नऊ ते बारा दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. हा प्रकार नित्याचाच झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. महापालिका चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणी देते, असा दावा केला जातो. पण, हा दावा फोल ठरला आहे. नियोजनाअभावी शहरात पाण्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे.

प्रशासकांकडून तक्रारी बेदखल

महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांची कार्यतत्पर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मात्र, पाण्याच्या प्रकरणाकडे ते गांभीर्याने पाहत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. जी. श्रीकांत यांच्याकडे असंख्य नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत. पण, त्याची दखलसुद्धा त्यांनी घेतली नाही, असा आरोप नागरिकांनी करत आहेत.

वेळ कमी, दूषित पाणी जास्त

महापालिकेतर्फे केवळ ४५ मिनिटे पाणी दिले जाते. पाण्याचा दाब कमी असल्यामुळे प्रत्येक जण नळाला मोटार लावतो. त्यातून कसेबसे दीड हजार लिटर पाणी मिळते. मात्र, त्यातही काही भागात नळाला सुरुवातीला ड्रेनेजमिश्रित पाणी येते. त्यामुळे पहिले दहा ते पंधरा मिनिटे पाणी रस्त्यावर सोडून द्यावे लागते. पाण्याच्या वेळादेखील निश्‍चित नाहीत. कधी सकाळी, कधी दुपारी तर कधी रात्री-अपरात्री नळाला पाणी येते. त्यामुळे नोकरदारांना केवळ पाण्यासाठी ताटकळत बसावे लागते.

महिन्यातून दोन ते तीनदाच मिळते पाणीऐन नवरात्रोत्सवात नागरिकांची भटकंती शहरात अनेक भागांचे कोलमडले वेळापत्रक सणासुदीचे दिवस असल्याने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू आहेत. परंतु, तांत्रिक बिघाड, वीजपुरवठा खंडित, जलवाहिनीची गळती व जायकवाडी धरणातून रोज ७ ते ९ एमएलडी कमी पाणी येत असल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.

के. एम. फालक, पाणीपुरवठा विभाग, कार्यकारी अभियंता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Latest Maharashtra News Updates : शिवसेनेने बोलावलेल्या आमदारांना पुन्हा मतदारसंघात जाण्याच्या सूचना

"आम्हाला आई-बाबा म्हणून निवडलंस" लेकाच्या दहाव्या वाढदिवशी रितेश-जिनिलियाने दिल्या खास शुभेच्छा , "एक उत्तम मुलगा..."

CERC Recruitment 2024: भारत सरकारने जाहीर केली नवीन भरती, 29 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

Pune: पोलिसांची कामगिरी वाचून व्हाल थक्क; स्मशानभूमीतील लाकडावरुन लावला खुनाचा तपास!

SCROLL FOR NEXT