alrt sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : ‘वॉन्टेड’ गुन्हेगार दिसताच मिळणार ‘अलर्ट’!

‘स्मार्ट सिटी’चा ‘आयस्कोप’ प्रकल्प अंतिम टप्प्यात .

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - ‘स्मार्ट सिटी’तर्फे राबविला जाणारा ‘इंटीग्रेटेड सेक्युरिटी अँड सिटी ऑपरेशन्स प्लॅटफॉर्म’ (आयस्कोप) प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून, शहरातील महत्त्वाच्या चौकांत व सिग्नलवर सुमारे १५० अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचा वापर पोलिसांच्या यादीतील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार, अतिरेकी पकडण्यासाठी होणार आहे. असे वॉन्टेड गुन्हेगार कॅमेऱ्यांमध्ये कैद होताच त्याचा ‘अलर्ट’ कंट्रोल रुमला मिळणार आहे.

स्मार्ट सिटीतर्फे शहरातील मुख्य चौक, रस्त्यांवर ७०० सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचा वापर गुन्हेगारांचा शोध घेण्यासह कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी होत आहे. या कॅमेऱ्याचे कंट्रोल पोलिस मुख्यालयात व स्मार्ट सिटी कार्यालयातील कंट्रोल रुममधून होत आहे. दरम्यान, आयस्कोप प्रकल्पाअंतर्गत नव्याने १५२ कॅमेरे बसविले आहेत, असे स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी यांनी सांगितले.

आयस्कोप प्रकल्पातून बसविण्यात आलेल्या या कॅमेऱ्यामुळे पोलिसांना आणखी मदत होणार आहे. पोलिसांना जर इतर जिल्ह्यातून, राज्यातून अतिरेकी, मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराबाबत सकर्ततेची सूचना मिळाली व तो शहरात दाखल झालाच तर कॅमेऱ्यांच्या मदतीने त्याचा अलर्ट पोलिस कंट्रोलरुमला मिळणार आहे. तशी व्यवस्था या कॅमेऱ्यांमध्ये आहे.

विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने या कॅमेऱ्यात अशा गुन्हेगारांच्या छायाचित्रांसह ओळख पटविण्यासाठी आवश्यक असलेली माहिती टाकण्याची सोय आहे. त्याच्या मदतीने संबंधित गुन्हेगार कॅमेऱ्यात कैद होताच त्याबाबतचे अलर्ट कंट्रोल रुमला मिळेल. हे कॅमेरे महिन्याभरात कार्यान्वित होतील. कॅमेऱ्यांसोबतच चौकांमध्ये ध्वनीक्षेपक बसविण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT