scholarship  Sakal
छत्रपती संभाजीनगर

यंदापासून गुणवंतांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना

अखिल देशस्थ ऋग्वेदी मध्यवर्ती मंडळाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाजाच्या वतीने १० वी आणि १२ वी शालांत परीक्षेतील सर्वशाखीय १२५ गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी (ता. नऊ) सत्कार करण्यात आला. शास्त्रीनगर भागातील शास्त्री हॉलमध्ये हा उपक्रम राबण्यात आला. दरम्यान, यंदापासून समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्याचा निर्णयही घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायाधीश अभिनंदन जनार्दन पाटंगणकर होते. डॉ. सलील पेंडसे आणि डॉ. शुभदा अर्धापूरकर वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. गुणवंतांना प्रशस्तिपत्र आणि मानचिन्ह देण्यात येऊन शिष्यवृत्तीसाठी अर्ज वाटप करण्यात आले.

नरेश जोशी, रवी जेऊरकर, अंबादास कुलकर्णी, डॉ. अमोल पांडव, प्रशांत दाभाडकर, श्रीपाद मुगुटे, वैभव देशपांडे, नरेश पटवर्धन, मिलिंद दाभाडकर, गोपाळ कुलकर्णी, पद्माकर कोटचिरकर, मकरंद धसे, महिला अध्यक्षा मोनिका चौधरी, मयूरी दाभाडकर, सीमा कस्तुरे, विभा देशपांडे, उत्कर्षा पारनेरकर, सीमा कस्तुरे, योगिनी देशमुख, रूपाली कुलकर्णी, समृद्धी चौधरी, मानसी दाभाडकर आदींची उपस्थिती होती. या वर्षापासून गुणवंतांना शिष्यवृत्ती योजनाही लागू करण्यात आली.

अखिल देशस्थ ऋग्वेदी मध्यवर्ती मंडळ मुंबई यांच्या वतीने यंदा प्रथमच १० वी आणि १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेला यावर्षीपासून सुरवात होणार आहे.

- प्रशांत दाभाडकर, आयोजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT