छत्रपती संभाजीनगर : टीव्ही सेंटर भागात एक केळी विक्रेता डबक्यात साचलेल्या पाण्याचा वापर करीत केळी ताजी ठेवण्याचा किळसवाणा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी अब्दुल रशीद अब्दुल लतीफ शेख (वय ६०, रा. जहांगीर कॉलनी) याला सिडको पोलिसांनी अटक केली. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे चंदू नवपुते यांनी गुन्हा दाखल केला होता.
हा प्रकार उघड झाल्याने परिसरातील नागरिकांत संताप आहे.मनसेचे विभागप्रमुख चंदू नवपुते यांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर विक्रेता अब्दुल रशीद अब्दुल लतीफ शेख याच्यावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला बुधवारी अटक केली.
गुन्हा अदखलपात्र असल्याने त्याला समज देऊन प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. नागरिकांत मात्र या प्रकारामुळे रोष निर्माण झाला आहे. ग्राहक विश्वास ठेवून उपवासासाठी फळे खरेदी करीत असतात. अशा प्रकारच्या घटनांमुळे फळविक्रेत्यांवर कसा विश्वास ठेवणार? असा प्रकार होत असेल, तर त्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
टीव्ही सेंटर येथील केळीविक्रेत्याने केली ती घटना चुकीची आहे. मनसेने कारवाईची मागणी केली आहे. त्याची दखल पोलिसांनी घेणे गरजेचे आहे.
— डॉ. संदीप जाधव
ज्यांच्या हातून ही चूक झाली त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी. पण आमची चूक नसतानाही नाहक त्रास होत आहे.
— दीपक खराबे, फळविक्रेता
आम्ही नेहमी या भागातून फळ खरेदी करतो. घरातील लहान मुले देखील फळे खातात. या प्रकारामुळे धक्काच बसला.
— नम्रता देशमुख, नागरिक
सध्या उपवास सुरू आहे. सर्वजण भक्तिभावाने उपवास करतात. मात्र, अशा प्रकारे जर उपवासाच्या फळामध्ये किळसवाणा प्रकार होत असेल तर लज्जास्पद आहे.
— मनीषा कुलकर्णी, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.