Aadivasi Hunger tribals  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : पाऊस लांबल्याने आदिवासींची उपासमार, रानभाज्या न उगवल्याने पोटाची चिंता

उत्पादनाची साधने नाहीत. अशावेळी आदिवासी जंगलातील रानभाज्यांवर अवलंबून असतात. पावसाअभावी या भाज्या उगवलेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी अडचणीत आले आहेत.

राजानंद सुरडकर, कन्नड

Chhatrapati Sambhaji Nagar - पाऊस लांबल्याने कन्नड तालुक्यातील आदिवासी हवालदिल झाले आहेत. पावसामुळे आदिवासींना जंगलात विविध रानभाज्या, कंदमुळे उपलब्ध होतात. मात्र, जून महिना संपत आला तरी वरुणराजा रुसलेलाच असल्याने रानभाज्या न उगल्याने आदिवासींवर उपासमारीची वेळ आली असून शेतकऱ्यांसह येथील आदिवासी आकाशाकडे डोळा लागून असल्याचे चित्र आहे.

कन्नड तालुक्यात ठाकरवाडी, जेहूर, चिवळी, कळंकी, अंबाला, पेडकवाडी, चिमणापूर, खोलापूर, तांदूळवाडी, काळदरी अशा डोंगर दऱ्यांत सतरा ठाकर वाड्या आहेत. या ठाकर वाड्यांवर आदिवासी वास्तव्यास आहेत. या आदिवासींचे जनजीवन प्रामुख्याने निसर्गचक्रावर अवलंबून आहे.

पावसाळ्यात या आदिवासींना कोळू, कुसरा, फुलकुर्डू, माठ, माठ, करटोला, गडूकंद, उळशा, आघाडी, अनवे, अमरकंद, फांद, करटुले, घोळ, आंबटचुका, बडदा, रानतोंडले, रानमेथा, भुईफोड, अशा अनेकविध रान भाज्या उपलब्ध होतात. या आदिवासींना जमिनी कमी आहेत. अद्यापही ते उपजिविकेसाठी निसर्गावर अवलंबून आहेत.

उत्पादनाची साधने नाहीत. अशावेळी आदिवासी जंगलातील रानभाज्यांवर अवलंबून असतात. पावसाअभावी या भाज्या उगवलेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी अडचणीत आले आहेत. ठाकरवाडी जेहूर येथील देवजी तुळा मेंगाळ यांनी सांगितले की, एकजरी पाऊस झाला तर पाटण्याच्या खोऱ्यात कोळूची भाजी उपलब्ध होते.

मात्र, यावेळी ही भाजी उगवली नाही. बडदा थोडी कुठंमुठं निघू लागलीय. वाल्हू राघू पथवे यांनी सांगितले की, कोकींदळ भाजीही दिसत नाही. या वेलीला जमिनीत कंद येतो. बडदा भाजीला जमिनीपासून उगवल्यानंतर जागीच हिरवी पाने येतात. या झाडाला स्पर्श केला तर खाज येते. ते कमी करण्यासाठी या भाजीत कैरी वाळवून घालावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT