Chhatrapati Sambhajinagar Constituency Lok Sabha Election Result Esakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Constituency Lok Sabha Election Result: ना जलील ना खैरे ऑन्ली भूमरे, वादांच्या भोवऱ्यात अडकूनही शिंदे गटाने मिळवला मोठा विजय

अंकिता खाणे (Ankita Khane)

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगा लढत पहायला मिळाली. यामध्ये अनेक आरोप झालेले शिवसेनेचे संदिपान भुमरे विजयी झाले आहेत. भुमरे हे औरंगाबादचे पालकमंत्री आहेत.

संदिपान भुमरे - ४,७६,१३०

इम्तियाज जलील - ३,४१,४८०

चंद्रकांत खैरे- २, ९३,४५०

विजयी उमेदवाराचे मताधिक्य- १,३४,६५०

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे संदिपान भुमरे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे तर MIM चे विद्यमान खासदार इम्तियाज जलिल देखील उभे आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलिल यांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता. 2019च्या आधी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी सलग चारवेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

गेल्या निवडणुकीत सलग चारवेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पहिल्यांदाच खासदारकी लढवणारे इम्तियाज जलील यांच्यात लढत होती. अवघ्या 4492 मतांनी चंद्रकांत खैरे हरले होते.

या लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची टक्केवारी 21 ते 22 टक्के इतकी आहे. तर अनुसुचित जाती- जमातीची संख्या 19 ते 20टक्के इतकी आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

सिल्लोडचे अब्दुल सत्तार (शिवसेना शिंदे गट), कन्नडचे उदयसिंह राजपूत शिवसेना ठाकरे गट), औरंगाबाद मध्यचे प्रदीप जैसवाल (शिवसेना शिंदे गट), औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाठ (शिवसेना शिंदे गट), औरंगाबाद पूर्वचे अतुल सावे (भाजप), गंगापूरचे प्रशांत बंब (भाजप), वैजापूरचे रमेश बोरनारे (शिवसेना शिंदे गट)

२०१९ च्या तुलनेत ०.४१ टक्क्यांनी मतदान घटले

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ६३.०७ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. २०१९ च्या तुलनेत ०.४१ टक्क्यांनी मतदान घटले. ६५.८६ टक्के म्हणजेच १० लाख ७७ हजार ८०९ पैकी ७ लाख ९ हजार ८१६ पुरुष मतदारांनी मतदान केले. तर ६०.०१ टक्के म्हणजेच ९ लाख ८१ हजार ७७३ पैकी ५ लाख ८९ हजार १८४ महिला मतदारांनी मतदान केले.

विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी

विधानसभा...................मतदानाची टक्केवारी........................किती वाढ / घट

कन्नड.............. ६६.७८................... ६४.८० टक्के...................... १.९८ टक्के घट

औरंगाबाद मध्य......... ६०.४०................... ६२.१९ टक्के............................ १.७९ टक्के घट

औरंगाबाद पश्चिम.......... ६०.५८.................. ६२.७८ टक्के....................... २.०२ टक्के घट

औरंगाबाद पूर्व........... ६१.११..................... ६२.८० टक्के........................ १.६९ टक्के घट

गंगापूर............ ६५.४४............................... ६५.८९ टक्के................. ०.४५ टक्के वाढ

वैजापूर .............. ६४.८०..................... ६२.०७ टक्के..................२...७३ टक्के घट

सरासरी.........६३.०७ टक्के...................एकूण ६३.४८ ....................०.४१ टक्के घट

२०१९ चे चित्र

इम्तियाज जलील (एमआयएम) विजयी मते : ३,८९,०४२

चंद्रकांत खैरे (शिवसेना) मते : ३,८४,५५०

हर्षवर्धन जाधव (अपक्ष) मते : २,८३,७९८]

सुभाष झांबड (काँग्रेस) मते : ९१,७९०

वर्चस्व

२००४ : शिवसेना

२००९ : शिवसेना

२०१४ : शिवसेना

२०१९ : एमआयएम

प्रभावी मुद्दे

पिण्याचा पाण्याचा मुद्दा खूप महत्त्वाचा, विकास आराखड्याचा मुद्दा महत्त्वाचा, शहराचे नामकरण झाल्याने धुव्रीकरण, मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप प्रभावी राहील, मतदानापूर्वी धार्मिक धुव्रीकरण होते, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासह पायाभूत सुविधांचा अभाव, सात दिवसाला येणारं पाणी, दुष्काळ, गुन्हेगारी, याशिवाय मराठा फॅक्टर महत्वाचा असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT