Theft Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News : दिवाळीपूर्वीच चोरांचे ‘फटाके’; गारखेडा, पारिजातनगरात भरदिवसा चार घरे फोडली

दिवाळी सणादरम्यान दरवर्षीच घरफोडीचे प्रमाण वाढते. मात्र, यंदा दिवाळी सुरू होण्याआधीच चोरांनी त्यांची ‘फटाके’ लावणे सुरू केले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - दिवाळी सणादरम्यान दरवर्षीच घरफोडीचे प्रमाण वाढते. मात्र, यंदा दिवाळी सुरू होण्याआधीच चोरांनी त्यांची ‘फटाके’ लावणे सुरू केले. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमानगर, गारखेडा आणि पारिजातनगरातील चार घरे फोडून रोख रक्कमेसह तब्बल तीन लाख ७३ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे या घटना भर दुपारी झाल्याचे समोर आले.

१५ मिनिटांत दोन लाखांचे दागिने लंपास

याप्रकरणी मीना नरेश शर्मा (४५, रा. हनुमाननगर, गारखेडा परिसर) यांनी तक्रार दिली. शर्मा यांचे पती चहाटपरी चालवून उदरनिर्वाह भागवितात. शुक्रवारी दुपारी दोनच्या दरम्यान मीना या औषधी आणण्यासाठी घराजवळील मेडिकल दुकानामध्ये गेल्या होत्या. अर्धा तासाने घरी परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

घरात असलेले एक लाख पाच हजारांचे साडेतीन तोळ्यांचे लाँग गंठण, ३० हजारांची एक तोळ्याची पोत, ३० हजारांचे एक तोळ्याचे नेकलेस, तीन हजारांची एक सोन्याची नथ, ३० हजार रुपयांच्या एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, असा दोन लाख आठ हजार रुपयांचे दागिने चोरी गेल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली.

शिक्षकाच्या घरात डल्ला

पारिजातनगर नगरात दोन घटना घडल्या. प्रभाकर गणपतराव पवार (५१, पारिजातनगर) हे तक्रारदार आहेत. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ते घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप व कडी तुटलेली दिसली. पत्नीला फोनवर कल्पना दिल्याने पत्नीनेही धाव घेतली.

चोराने ८५ हजार रुपयांची अडीच तोळ्यांची पोत, ३० हजारांची एक तोळ्याची अंगठी, २८ हजारांचे ९ ग्रॅमचे कानातले, रोख दोन हजार लंपास झाली. शिवाय त्यांचे शेजारी शरदचंद्र सांबरे यांच्या घरातील १० हजार रुपयांची रोकड चोरांनी लंपास केली.

फ्लॅटमधून ७० हजारांचा ऐवज लंपास

चौथ्या घटनेत क्षितीजा रमेश खोतकर (२५, रा. गिरीतारा अपार्टमेंट, चौरंगी हॉटेलजवळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या कुटुंबीयांसह पुण्याला गेल्या होत्या. रविवारी (ता. पाच) सर्वजण घरी आले असता त्यांना कडी-कोयंडा उचकटलेला दिसला.

कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले; तसेच ड्रॉवरमधील सोन्याच्या पळ्या, मणी मंगळसूत्र असे ३० हजारांचे दागिने आणि रोख ४० हजार रुपये असा ७० हजारांचा ऐवज लंपास झाल्याचे समोर आले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

दिवाळीत वाढतात घटना

उत्साह, आनंदाची पर्वणी असलेल्या दिवाळीत कुठलेही गालबोट लागू नये याची सावधगिरी प्रत्येकाने बाळगायला हवी. दिवाळीची खरेदी करायची असेल, पर्यटनाला जायचे असेल, बाहेरगावी जायचे असेल तर घराच्या सुरक्षेकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण दिवाळीच्या काळात घर बंद असल्याने चोरटे सावज साधतात. या काळात चोरीच्या घटना वाढतात.

घराला कुलूप लावून जाण्यापूर्वी

घराच्या बाहेर कुठेही जात असाल तर घराला कुलुप लावून जाण्यापूर्वी काळजी घ्यावी. घरातील सर्व खिडक्या नीट लावून घ्याव्यात. कुलूप बरोबर लागले आहेत की नाही हे बघून घ्यावे. जाण्यापूर्वी शेजाऱ्याशी दोन शब्द बोलून त्यांना घराकडे थोडे लक्ष ठेवा, अशी विनंती करावी. तुम्ही जर बाहेरगावी जात असाल तर नजिकच्या पोलिस ठाण्यातसुद्धा सूचना देऊन जावे.

मौल्यवान वस्तू घरात ठेवू नका

घराच्या बाहेर काही दिवसांसाठी जात असाल किंवा दिवसभर जरी घराला कुलूप राहत असेल तर या मौल्यवान वस्तूची सुरक्षा नीट राहील याची काळजी घ्यावी. बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या लॉकरमध्येसुद्धा या मौल्यवान वस्तू ठेवू शकता. विश्वासाच्या नातेवाइकाकडे अथवा मित्रांकडेसुद्धा वस्तू ठेवल्यास मोठा धोका होणार नाही.

पडेगावात रात्रीतून तीन दुकाने फोडली

पडेगाव परिसरात एकाच रात्री चोरांनी सलग तीन दुकाने फोडून रोकडसह ६६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. फोडलेल्या दुकानांत किराणा, कपड्याचे दुकान आणि औषधी दुकानाचा समावेश आहे. ही घटना रविवारी (ता. पाच) पहाटे पडेगावातील मीरानगरात घडली.

याप्रकरणी दुकानमालकाच्या फिर्यादीवरून चोराविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिन्ही घटनेच्या अनुषंगाने दाखल फिर्यादीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास हवालदार दिलीप जाधव करीत आहेत.

पहिली घटना

कुंतीलाल अंबादास हिरण (३९, रा. शांती निवास, बेगमपुरा) यांचे मीरानगरात जैन मिश्री ट्रेडिंग नावाचे किराणा दुकान आहे.रात्री दहा वाजल्यादरम्यान दुकान बंद करून ते घरी गेले होते. पहाटे साडेतीन वाजल्यादरम्यान त्यांना पडेगावातील सुभाष वाघ यांनी फोन करून दुकानात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने दुकानात पाहणी केली असता, रोकड दहा हजार, दहा लीटर तूप आदी साहित्य असा एकूण १८ हजार रुपयांचा माल चोरी झाल्याचे समोर आले.

दुसरी घटना

कुंतीलाल यांच्या जवळच असलेल्या विमल भाऊसाहेब साळुंखे (४४, रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) यांचे कौशल्य कलेक्शन हे कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दीड हजार रुपयांची रोकड, १५ हजारांच्या नवीन साड्या, सहा हजारांचे गारमेंट असे एकूण २२ हजार ५०० रुपयांचे कपडे चोरुन नेले.

तिसरी घटना

राहुल अशोक दुशिंग (३२, रा. राहुलनगर, रेल्वे स्थानक) यांच्या औषधी दुकानाचे शटर उचकटून चोरांनी १० हजार रुपयांची रोकड तसेच आठ हजारांचे बेबी फूड, आठ हजारांचे कॉस्मेटिक लोशन असा एकूण २६ हजार रुपयांचा माल लंपास केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT