tankers tippers vacuum vans sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : महापालिकेची वाहने मिळणार भाड्याने; टॅंकर, टिप्पर, व्हॅक्युम व्हॅनचा समावेश; असे आहेत दर

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने यांत्रिकी विभागासाठी कोट्यवधी रुपयांच्या वाहनांची खरेदी केली आहे. यातील अनेक वाहने काम नसल्याने उभीच राहतात. त्यामुळे टॅंकर, टिप्पर, व्हॅक्युम व्हॅन, पोकलेन, जेटिंग मशीनसह इतर वाहने भाड्याने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी दर निश्‍चित करण्यात आले असून, नागरिकांनी मागणी केल्यावेळी ही वाहने उभी असतील तर ती भाड्याने दिली जाणार आहेत.

महापालिकेच्या यांत्रिकी विभागातील अनेक वाहने जुनी झाली होती. त्यामुळे अशी वाहने लिलावात काढण्यात आली. त्यानंतर गेली काही वर्षांत महापालिका निधी, वित्त आयोगाच्या निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून नवी वाहने खरेदी करण्यात आली.

या वाहनांचा वापर अतिक्रमण हटाव मोहिमा, पावसाळ्यापूर्वी नाल्यांतील गाळ काढणे यासह इतर कामांसाठी केला जातो. पण, अनेक वेळा वाहने यांत्रिकी विभागातच उभी राहतात. त्यामुळे ही वाहने खासगी व्यक्तींना भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी भाडे दरही निश्‍चित करण्यात आले आहेत, असे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी कळविले आहे.

असे आहेत दर

वाहने - दर (प्रति किलोमीटर)

  • टिप्पर्स (२८००० जीव्हीडब्ल्यू) - १२५ रुपये

  • टिप्पर्स (१८५०० जीव्हीडब्ल्यू) - ९० रुपये

  • टिप्पर्स (९५०० जीव्हीडब्ल्यू) - ५० रुपये

  • ट्रक (६९५० जीव्हीडबल्यू) - ४० रुपये

  • जेसीबी - १२०० रुपये

  • हूक लोडर्स - ९० रुपये

  • ट्रॅक्टर लोडर्स - ६०० रुपये

  • टॅंकर्स (५ हजार लिटर) - ५० रुपये

  • टॅंकर्स (१० हजार लिटर) -- ९० रुपये

  • टॅंकर्स (२० हजार लिटर) १२५ रुपये

  • ॲम्ब्युलन्स (लोकल) - १ हजार रुपये प्रति ट्रिप

  • ॲम्ब्युलन्स (शहराबाहेर) - ३० रुपये

  • व्हॅक्सिन व्हॅन - ३ हजार प्रतिदिन (८० किलोमीटर)

  • पोकलेन (१४०) - १६०० रुपये प्रतितास

  • पोकलेन (२१०) - २१०० रुपये प्रतितास

  • स्वीपिंग मशीन्स (मोठी) - २ हजार रुपये प्रतितास

  • स्वीपिंग मशीन्स (लहान) - १५०० रुपये प्रतितास

  • रोलर-६ टन - ९०० रुपये प्रतितास

  • ट्रॅक्टर्स - ३ हजार रुपये प्रतिदिन

  • मोबाइल टॉयलेट व्हॅन (लोकल) - २ हजार रुपये प्रतिदिन

  • मोबाइल टॉयलेट व्हॅन (शहराबाहेर)- ३ हजार रुपये प्रतिदिन

  • टाटा एसीई - २५०० रुपये प्रतिदिन

  • हायड्रोलिक लेंडर - १० हजार रुपये प्रतिदिन

  • जेटिंग मशीन्स - १०० रुपये प्रतिफूट

  • व्हॅक्युम मशीन - १७०० रुपये प्रति ट्रिप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

Justice Idol: कायदा आता आंधळा नाही! न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन्..., सरन्यायाधिशांचा मोठा निर्णय

Shyam Manav: श्याम मानव यांच्या ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

Latest Maharashtra News Updates : बीएमसीने 17-18 ऑक्टोबर रोजी मुंबईत 5-10 टक्के पाणीकपात जाहीर केली

SCROLL FOR NEXT