Rain Winter sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : स्वेटर घालावे की छत्री धरावी, कळेचना!

पावसाळा संपला अन हिवाळ्याची सुरवात झाली. रेनकोट, छत्र्या कपाट, ट्रंक अन गाठोड्यात गेले आणि उबदार कपडे बाहेर आले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - पावसाळा संपला अन हिवाळ्याची सुरवात झाली. रेनकोट, छत्र्या कपाट, ट्रंक अन गाठोड्यात गेले आणि उबदार कपडे बाहेर आले. मात्र, गेल्या दोन दिवसांतील वातावरणाने पुन्हा उबदार कपडे ठेवून रेनकोट काढण्याची वेळ आणली. यापूर्वी १९९६ मध्ये नोव्हेंबरमध्ये पावसाने असेच झोडपले होते, त्याची २७ वर्षांनी पुनरावृत्ती झाली.

खऱ्या अर्थाने थंडीची चाहूल लागते ती येळवसपासून (येळ अमावस्या). येळवस सुरू होताच मारुतीच्या मंदिरामागे बसलेली थंडी हळूच गावामध्ये प्रवेश करते, असा ग्रामीण भागात हिवाळा सुरू होण्याविषयीचा ठोकताळा आहे. प्रादेशिक हवामान खात्याने ता. २५ पासून २७ नोव्हेंबरपर्यंत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, अनेकांनी हवामान खात्याच्या अंदाजाला धुडकावले.

रविवारचा सुटीचा दिवस अनेकांसाठी फिरण्यासाठीचा. दिवसभर आराम करून संध्याकाळच्या वेळेस मस्तपैकी भटकंती करण्यासाठी अनेकजण निघाले अन् नेमके त्याच वेळेस हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने हजेरी लावली. नुसती हजेरीच लावली नाही तर शहराला चांगलेच झोडपले. अनेकांचे स्वेटर, मफलर, कानटोप्या आल्या झाल्या.

दुचाकी चालविणाऱ्यांना पावसात भिजत गारव्यामुळे थरथरत्या हाताने दुचाकी चालवत घर गाठण्याची वेळ आली. सोमवारी रात्रीही चांगलाच पाऊस झाला. त्यामुळे कपाटात ठेवलेले रेनकोट बाहेर काढावे लागले. असेच वातावरण ३ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.

नोव्हेंबरमध्ये भारतभर १९ ते २० मिलिमीटर अवकाळी पाऊस होत असतो. मात्र, यावेळी याचे प्रमाण जास्त राहिले. यापूर्वी १९९६-९७ मध्ये नोव्हेंबरमध्ये असाच मोठा पाऊस झाला होता. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि दक्षिणेकडून येणारे बाष्प यांची टक्कर होऊन अशी परिस्थिती निर्माण होते. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत साधारण अशी स्थिती असते.

- उदय देवळाणकर, शेती व हवामानाचे अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT