sambhajinagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : दंड दुप्पटीने, तरीही रस्त्यावर कचरा

महापालिकेच्या कारवायांना नागरिकांचा ‘खो’

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराला इंदूरप्रमाणे स्वच्छ करण्याचा निर्धार प्रशासक जी. श्रीकांत यांनी केला आहे. पण, त्याला नागरिकांची साथ मिळत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांनी रस्त्यावर कचरा फेकून विद्रुपीकरण करू नये, त्यांना शिस्त लागावी यासाठी रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांसाठींचा दंड दुप्पटीने वाढविण्यात आला आहे, असे असले तरी शहरात रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

महापालिकेने कचऱ्याचे संकलन करण्यासाठी रेड्डी कंपनीची नियुक्ती केली आहे. रेड्डी कंपनीच्या कामगारांना घराघरांतून ओला व सुका असा वेगवेगळा कचरा संकलित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ते नागरिक मिक्स कचरा देतील, त्यांचा कचरा घेऊ नका, असे आदेश प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक कचरा वर्गीकरण न करता सफाई कामगारांसोबत वाद घालत आहेत तर काही भागात रस्त्यावर कचरा फेकला जात आहे.

रस्त्यावर कचरा फेकून विद्रुपीकरण करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने दंडाच्या रकमेत दुप्पटीने वाढ केली आहे. रस्त्यावर थुंकल्यास पूर्वी १०० रुपये दंड होता आता तो ५०० रुपये करण्यात आला. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांसाठी पूर्वी ५०० रुपये दंड होता, आता एक हजार रुपये दंड करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कचरा टाकल्यास दंडाची रक्कम २० हजारांपर्यंत करण्यात आली आहे. मात्र, दंडाची रक्कम वाढवूनही कारवाईचा धाक नसल्याचे चित्र आहे. आजही रस्त्यावर रात्री-अपरात्री, पहाटेच्यावेळी कचरा फेकला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : मुंबईवर कोणी हल्ला केला तर मोदी त्यांना पातळातूनही शोधून काढेन, सोडणार नाही - मोदी

SCROLL FOR NEXT