complaints of vehicle stalling Petrol Dealers Association alleges 20 percent ethanol in fuel  Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar : वाहने बंद पडण्याच्या वाढल्या तक्रारी; इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल, पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा आरोप

Ethanol In Fuel : ग्राहकांकडून वाहने बंद पडल्याच्या तक्रारी येताच पेट्रोल डीलर्स असोसिएशनने गुरुवारी (ता.११) घेतलेल्या पत्रकार परिषदेत याचा भांडाफोड केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढविण्याचे आदेश देताच पेट्रोलियम कंपन्यांनी यासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती न करताच परस्पर पेट्रोलपंप डीलर्स यांच्याकडे इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल मिसळून पाठविण्यास सुरवात केली.

ग्राहकांकडून वाहने बंद पडल्याच्या तक्रारी येताच पेट्रोल डीलर्स असोसिएशनने गुरुवारी (ता.११) घेतलेल्या पत्रकार परिषदेत याचा भांडाफोड केला आहे. इथेनॉलचा वापर वाढविण्यात आला असला तरी इंधनाच्या दरामध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही हे विशेष!

देशात वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने ग्रीन इंधनाचा वापर वाढविण्याचे आदेश पेट्रोलियम कंपन्यांना दिले आहेत. त्यानुसार पेट्रोलियम कंपन्यांनी सुरवातीला इंधनामध्ये ५ टक्के इथेनॉल वापरण्यास सुरवात केली. इथेनॉलचा वापर मर्यादित असल्यामुळे वाहनामध्ये टाकण्यात येत असलेल्या इंधनाचा परिणाम जाणवत नव्हता.

वाहने बंद पडण्याच्या तक्रारी देखील नव्हत्या. मात्र, इंधनामध्ये इथेनॉलचा वापर वाढविण्याचे आदेश मिळाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी वाहनधारकांमध्ये कोणतीही जनजागृती केली नाही. पेट्रोल डीलर्स असोसिएशनला देखील विश्वासात न घेताच परस्पर २० मेपासून पेट्रोलपंपावर पाठविण्यात येणाऱ्या इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल टाकून ते पाठविण्यास सुरवात केली.

याबाबत पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास म्हणाले, की इंधनामध्ये २० टक्के इथेनॉलचा वापर करण्यापूर्वी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, पेट्रोलपंपावर बोर्ड लावावे, इथेनॉलच्या अधिक वापरामुळे कोणते फायदे होणार याबद्दलची माहिती वाहनधारकांना द्यावी, असे पत्र पेट्रोलियम कंपन्यांनी पाठविले होते.

पावसाळ्यात वाहनांमध्ये इंधन भरताना पाण्याचा एक थेंब जरी इंधनामध्ये पडला तरी इंधनाचे पाणी होते. याचा परिणाम आता मोठ्या प्रमाणावर जाणवत असून वाहनांच्या टाकीमध्ये पाणी निघत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वाहनांचे इंजिन खराब होत असून अंतरदेखील कमी झाले आहे. वाहनधारकांना समजून सांगण्यास पेट्रोलपंपचालक-मालक असमर्थ ठरले आहेत, असेही अखिल अब्बास यांनी स्पष्ट केले.

इथेनॉलचा वापर वाढला, इंधनाचे दर मात्र ‘जैसे थे’!

इंधनामध्ये इथेनॉल २० टक्के टाकले जात असून इथेनॉलचा वापर वाढविण्यात आला आहे. मात्र, त्या तुलनेत इंधनाचे दर कमी करण्यात आलेले नाहीत. पेट्रोलचा दर १०५ रुपये ११ पैसे प्रतिलिटर इतका आहे, तर डिझेलचा दर ९१ रुपये ३६ पैसे प्रतिलिटर इतका आहे. एकीकडे पेट्रोलियम कंपन्यांकडून स्वस्त दरात इथेनॉल खरेदी केले जात असून इंधनामध्ये त्याचा वापर वाढविण्यात आला असला तरी इंधनाचे दर जैसे थे ठेवण्यात आल्यामुळे ग्राहकांच्या खिशावर एकप्रकारे दरोडा टाकला जात असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT