औरंगाबाद - भाजपच्या पंचायत समितीच्या उपसभापतींना काँग्रेसच्या सदस्यांकडून मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.  सकाळ
छत्रपती संभाजीनगर

काँग्रेस सदस्यांची भाजपच्या पंचायत समिती उपसभापतींना मारहाण

सुनील इंगळे

औरंगाबाद : चार दिवसांपूर्वी काँग्रेसचे (Congress Party) नाराज पंचायत समितीचे (Aurangabad Panchayat Samiti) सदस्य अर्जुन शेळके यांनी भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) प्रवेश करत औरंगाबाद पंचायत समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळविला होता. काँग्रेसच्या सदस्यांना हा पराभव सहन झाला नाही. त्यामुळे सोमवारी (ता.दोन) भाजपचे उपसभापती अर्जुन शेळके यांच्या दालनात घुसून काँग्रेसच्या काही सदस्यांनी त्यांना मारहाण केली. या घटनेची माहिती शेळके यांनी आमदार हरिभाऊ बागडे (MLA Haribhau Bagde) यांना दिली. श्री. बागडे यांनी तात्काळ पंचायत समितीला भेट दिली. सोमवारी काँग्रेस सदस्य अनुराग शिंदे यांच्यासह सहा ते सात जणांनी उपसभापतींच्या दालनात येत हल्ला केल्याचा उपसभापती शेळके यांनी आरोप केला आहे.

दालनातील खुर्च्यांची फेकाफेकी करण्यात आली असून खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. गेल्या गुरुवारीच (ता.२९) औरंगाबाद पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भाजपचे अर्जुन शेळके हे विजयी झाले आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश केला होता. निवडणुकीत शेळके यांना दहा, तर काँग्रेसच्या पराभूत उमेदवार अनुराग शिंदे यांना नऊ मते पडली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT