covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

Coronavirus| 'लहान मुलांच्या प्रकृतीवर ठेवा महिनाभर बारकाईने लक्ष'

पोस्ट कोविडचा धोका, महापालिकेचे आवाहन

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे आरोग्य विभागातील तज्ज्ञ सांगत आहेत. कोरोना संसर्गानंतर पोस्ट कोविडमुळे मुलांना त्रास होऊ शकतो, असाही अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मुलांवर बरे झाल्यानंतर पालकांनी महिनाभर बारकाईने लक्ष ठेवावे. आजार जाणवल्यास तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी गुरुवारी (ता. १३) केले.

कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली जात असल्याने महापालिका प्रशासनाने आत्तापासून तयारी सुरू केली आहे. २०० बेडचे रुग्णालय खास मुलांसाठी सुरू केले जाणार आहे. दुसऱ्या लाटेतही कोरोनाबाधित मुलांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरात शून्य ते पाच वयोगटातील एक हजार ३३७ आणि पाच ते अठरा वयोगटातील सात हजार ५७९ बालके आत्तापर्यंत कोरोनाबाधित आढळून आली आहेत. गेल्या तीन दिवसात ९४ बालके बाधित आढळून आली आहेत.

अनेक कुटुंबात पालकांसह बालकांना संसर्गाची लागण होत आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता बालकांना ताप, सर्दी, खोकला असे आजार जाणवताच तातडीने उपचार घ्यावेत. लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षण असलेली बालके कोरोना मुक्त झाल्यानंतरही पालकांची त्यांची काळजी घ्यावी. महिनाभर बालकांवर विशेष लक्ष देऊन काही आजार निदर्शनास आल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. त्यामुळे पोस्ट कोविडचा धोका टाळता येऊ शकतो, असे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT