covid 19 covid 19
छत्रपती संभाजीनगर

लसीकरणासाठी तरुणांची गर्दी; कुपन संपल्याने माघारी फिरण्याची वेळ

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण (above 18 covid 19 vaccination) सुरू होताच मंगळवारी (ता. २२) तरुणांनी लस घेण्यासाठी मोठी गर्दी केली. सकाळपासून केंद्रावर रांगात रांगा लागल्या होत्या. रांगेत थांबलेल्या २०० नागरिकांना कुपन देण्यात आले. त्यानंतर आलेल्यांचा मात्र हिरमोड झाला. त्यांना आल्यापावली परत फिरावे लागले. काहींनी रांगा पाहून काढता पाय घेतला.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण राज्य शासनाने लसींच्या तुटवड्यामुळे या गटाच्या लसीकरणाला स्थगिती दिल्यानंतर लसीकरणाचा बोजवारा उडाला होता. दरम्यान केंद्र शासनाने लसीकरण नियमात बदल करत मंगळवारपासून १८ वर्षापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेने मंगळवारी ६९ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था केली होती. त्यापूर्वी दोन दिवस ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मंगळवारी १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करताना गोंधळ उडणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली.

त्याकरिता प्रत्येक केंद्रावर दोनशे लसीचे डोस पाठविण्यात आले व कुपन पध्दतीचा अवलंब करण्यात आला. रांगेत थांबलेल्या नागरिकांना कुपनाचे वाटप करण्यात आले. कुपन संपल्यानंतर केंद्रावर आलेल्या नागरिकांना परत फिरावे लागले. अनेकांनी लसीकरण केंद्रावरील रांगा पाहून माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. दुपारनंतर दोनशे लसी संपल्याने केंद्रावर शुकशुकाट होता. ईएसआयसी येथील केंद्रावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. विवेक भोसले, आरएमओ डॉ. अंजली बनसोड, परिवेक्षिका स्वाती पाताळयंत्री, सुमीत केंद्रे, नुतन सुरडकर, समीर आघाव, टाडा ऑपरेटर सागर सरकटे, गोवर्धन आगळे, नितीन जाधव, राजू हिवाळकर यांनी पुढाकार घेतला.

केंद्रांची संख्या वाढवणार
महापालिकेने प्रत्येक वॉर्डात म्हणजेच ११५ लसीकरण केंद्र सुरू केले होते. पण मध्यंतरी लसीचा तुटवडा असल्याने केंद्रांची संख्या कमी करण्यात आली. आता लसीकरण केंद्रावर गर्दी होत असल्याने बुधवारी (ता. २३) आणखी काही केंद्र वाढविण्यात येणार आहे, सध्या कोविन अ‍ॅपवर नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्याने लस दिली जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

१३ हजार जणांनी घेतली लस-
शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर मंगळवारी १३ हजार २३० जणांनी लस घेतली. सोमवारी (ता. २१) १२ हजार ३९३ जणांनी लस घेतली होती. आणखी सात केंद्र वाढविण्यात येणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT