website 
छत्रपती संभाजीनगर

कोरोना लसीकरणाची वेबसाइट‘हॅक’, लस न घेताच प्रमाणपत्रासाठी नावे

मधुकर कांबळे

औरंगाबाद : कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेत लस न घेताच प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काहीजण प्रयत्न करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लस न घेताच केवळ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एकाच कुटुंबातील १६ जणांची नावे वेबसाईटमध्ये घुसडण्यात आली. डीकेएमएम लसीकरण केंद्रात झालेला हा प्रकार डाटा ऑपरेटरच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. या प्रकरणी मनपाने (Aurangabad Municipal Corporation) चौकशी सुरू केली आहे. आरेफ कॉलनी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत बेगमपुरा येथील डीकेएमएम लसीकरण केंद्रावर शनिवारी (ता.२८) हा प्रकार घडला. या आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. अंबरीन यांनी या प्रकरणी तक्रार दिल्याची माहिती डॉ. पारस मंडेलचा, डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. या संदर्भात डॉ. पाडळकर म्हणाल्या की, शहरात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. नागरिकांकडून (Aurangabad) लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी(ता. २८) शहरातील ५६ केंद्रावर लसीकरण सुरू होते. नेहमीप्रमाणे डिकेएमएम महाविद्यालयाच्या लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी होती. पहिल्या टप्यात ५५ टोकन वाटण्यात आले होते. टोकन दिलेल्या प्रत्येक व्यक्तींची नोंदणी रजिस्टर मध्ये करुन त्यानंतर डीकेएमएमच्या कोवीन पोर्टलमध्ये त्याची नोंद घेतली जात होती.

५५ जणांचे लसीकरण झाल्यानंतर डाटा ऑपरेटर शकील खान यांनी सगळ्या नोंदणी बरोबर झाल्या आहेत का? हे पाहण्यासाठी ॲप तपासले तेव्हा त्यांना ७१ जणांनी लस घेतल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती टास्कफोर्सचे तांत्रिक विभागाचे प्रमुख हेमंत राठोड यांना दिली. त्यांनी तत्काळ या केंद्रावरील लसीकरण थांबवले. ही माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडेलचा, डॉ. नीता पाडळकर आणि अतिरिक्त आयुक्त बी. बी नेमाने यांना दिली. प्रथमदर्शनी लस न घेता केवळ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही लोकांनी ॲपचा पासवर्ड हॅक करत अशा प्रकारची नोंदणी केली असावी असा संशय आहे. आता पर्यंत या ठिकाणचे ऑपरेटर शकील हे ऑनलाइन नोंदणीसाठी त्यांचा स्वत:चा लॅपटॉप वापरत होते. मात्र शनिवारी पहिल्यांदा महाविद्यालयाच्या संगणकातून नोंदणी करण्यात सुरवात करण्यात आली होती. बेगमपुरा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील १६ सदस्यांची नावे घुसडल्याचे समोर आल्याचे कळते.

महापालिकेकडून चौकशी

डीकेएमएम केंद्राचे पोर्टल हॅक करून लस न घेताच प्रमाणपत्र घेण्यासाठी नाव नोंदणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने डॉ. मनिषा भोंडवे, डॉ. मेघा जोगदंड, हेमंत राठोड यांच्या मार्फत चौकशी केली जाणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

आता उघडले डोळे

पोर्टल हॅक करून लस न घेता प्रमाणपत्र घेतले जात असल्याचे यापूर्वीही पुढे आले होते. या संबंधी कोणतीही तक्रार नव्हती. त्यामुळे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले होते. मात्र आता हा प्रकार समोर येताच आरोग्य विभागाचे डोळे उघडले. या प्रकारानंतर सोमवारी या केंद्रावर होणारे लसीकरण रद्द करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC नेत्यांचा तो संशय खरा? शरद पवार फक्त मराठ्यांचे नेते यावर शिक्कामोर्तब झालंय, काय म्हणाले आंबेडकर?

Mumbai Local Train Mega Block: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

Sakal Podcast: 'सनातन मंत्रालया'च्या स्थापनेची मागणी ते शेअर्स विकण्यासाठी द्यावे लागणार 'इतके' रुपये

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा कडधान्यांचे पौष्टिक ब्रेड रोल, नोट करा रेसिपी

Mumbai University Senate Election 2024 Result: सिनेट निवडणुकीत युवासेनेचा सर्व 10 जागांवर दणदणीत विजय; मातोश्रीवर आज जल्लोष

SCROLL FOR NEXT