File Photo 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना रुग्णसंख्या @७५०, दिवसभरात ६२ पॉझिटीव्ह

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात गत दोन दिवसांत चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असतानाच आज (ता. १४) पहाटे पाच वाजून २० मिनिटांनी हुसेन कॉलनीतील ५५ वर्षीय महिलेचा कोरोना व इतर आजाराने मृत्यू झाला. आता शहरातील मृतांचा आकडा चिंताजनक असून तो २० वर पोचला आहे. तर दिवसभरात ६२ जणांना कोरोनाची लागण झाली असुन बाधित रुग्णांची संख्या ७५० झाली आहे.

अशी माहिती जिल्हा प्रशासन व घाटी रुग्णालयाकडुन देण्यात आली आहे. या रुग्णात अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथील वीस वर्षीय महिला घाटीत उपचार घेत आहे. 

५५ वर्षीय मृत महिला गारखेडा, हुसेनकॉलनी येथे राहत होती. बारा मे रोजी अकराच्या सुमारास एका खासगी रुग्णालयातून त्यांना घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले होते.

त्यांना पूर्वीपासून मधुमेह, उच्चरक्तदाब व हायपोथॉयरॉडीसमचा त्रास होता. १२ मे रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव आला होता. अतिदक्षता विभागात कोविड-१९ आजाराचे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आज १४ मे रोजी पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी त्यांचा न्यूमोनिया विथ एआरडीएस ड्युटू कोविड -१९ सोबतच उच्चरक्तदाब, मधुमेह मेलिटिस आणि हायपोथायरॉईडीसम या आजाराने मृत्यू झाला. 

औरंगाबादेत आज या भागात आढळले रुग्ण - 

भीमनगर भावसिंगपुरा -१५
शिवपुरी पडेगाव -१
उस्मानपुरा -७
सिल्कमिल कॉलनी -१
कांचनवाडी -१
नारळीबाग -१
आरटीओ कार्यालय -२
गरमपाणी -१
बन्सीलाल नगर -१
सातारा परीसर -२
आलोकनगर सातारा परिसर-१
सातारा ग्रामपंचायत -५
सातारा खंडोबा मंदिरजवळ -१
संजयनगर, मुकुंदवाडी -४
हुसेन कॉलनी -२
दत्तनगर गल्ली न. ५- १
न्यायनगर -२
पुंडलिकनगर -२
गुरूनगर -१
न्यू नंदनवन कॉलनी -१
गारखेडा -१
शहानूरवाडी -१
बेगमपुरा -१
बजाजनगर (वाळुज) -१
किराडपुरा -१
बारी कॉलनी, रोशनगेट -१
आसेफिया कॉलनी -१
कटकटगेट -१
इंदीरानगर, बायजीपुरा- १
इतर -१
एकूण - ६२

१८ महिण्यांच्या बाळाला कोरोना 
शहरातील उस्मानपुरा भागातील अठरा महिण्याच्या बाळाला कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दिवसभरात एकुण १० मुलं बाधीत आढळले. यात सहा मुली व चार मुलं असुन अठरा महिणे ते सोळा वर्ष असे त्यांचे वय आहेत. एकुन ६२ बाधीतांमध्ये २८ महिला व ३४ पुरुष आहेत. 

कोरोना मीटर 
उपचार घेणारे रुग्ण - ५२० 
बरे झालेले रुग्ण - २१० 
एकूण मृत्यू - २० 

-------------------

एकूण रुग्णसंख्या - ७५० 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT