औरंगाबाद: दुसऱ्या लाटेत वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने दिलासादायक स्थिती निर्माण होत आहे. करोनाबाधितांची संख्या घटत असल्याने महापालिका प्रशासनाने १० कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाने कोवीड केअर सेंटरमध्ये वाढ केली. सुरुवातीला मेल्ट्रॉन, एमआयटी व पदमपुरा या ठिकाणचेच कोवीड केअर सेंटर सुरु होते. मात्र आवश्यकतेनुसार वाढ करीत ही संख्या २१ वर गेली आहे. एप्रिल अखेरच्या सप्ताहापासून रुग्णांची संख्या कमी होत असल्याने काही कोविड केअर सेंटर बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
ही आहेत सेंटर-
शासकीय तंत्रनिकेतन वसतीगृह
श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज
संत तुकाराम वसतीगृह
शासकीय विज्ञान संस्थेचे वसतीगृह
शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे मुले आणि मुलींचे वसतीगृह
देवगिरी महाविद्यालयातील मुलींचे वसतीगृह
विद्यापीठातील छत्रपती वसतीगृह
यशवंत वसतीगृह
पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय
या कोविड केअर सेंटरचा बंद करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये समावेश आहे. भविष्यात गरज पडली तर ते सेंटर पुन्हा सुरु केले जातील असे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगीतले. सध्या ११ कोविड केअर सेंटर सुरु आहेत. त्या ठिकाणी ११९८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात पुरुष रुग्णांची संख्या ६८३ तर महिला रुग्णांची संख्या ५०५ आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.