crime increase in valuj midc area sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : उद्योगनगरीत गुंडाराज! वाळूज एमआयडीसी परिसराला गुंडांची लागली दृष्ट

सकाळ वृत्तसेवा

- विजय देऊळगावकर

छत्रपती संभाजीनगर - काहीजण दुचाकीवर येतात, उद्योजकाला अडवितात, रक्कम लुटतात अन् धमकी देऊन निघून जातात. चार ते पाच जण घोळक्याने ऐटीत कंपनीत येतात. बळेच पाहणी करण्याचे नाटक करतात. तुमच्या कंपनीत हे नाही, ते नाही, असे हवे, तसे हवे करून उद्योजकांना हैराण करतात अन् पैसे लाटतात.

काही बहाद्दर तर माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून उद्योजकांना पैशांसाठी ब्लॅकमेल करतात. अशा प्रकारांमुळे ‘उद्योगनगरी’ म्हणून ओळख मिळविलेल्या वाळूज एमआयडीसी परिसराला गुंडांची दृष्ट लागली आहे. वाढत्या गुंडगिरीमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत.

वाळूज एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात लघु उद्योजक तसेच मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. यातून लाखो कामगारांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात गुंडांचा उपद्रव वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात एक उद्योजक कारने जात असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांची कार अडवली. या उद्योजकाला कारची काच खाली करायला सांगितले.

उद्योजकाने काही काम असेल, असे वाटल्याने काच खाली केली असता त्यांना चाकूचा धाक दाखवत रक्कम हिसकावून घेतली. तसेच त्यांच्या हातातील अंगठी देखील हिसकावण्याचा प्रयत्न गुंडांनी केला. तसेच फेब्रुवारी महिन्यात एका उद्योजकाला कार अडवून मारहाण केल्याची घटना घडली होती.

नशेखोरांचा त्रास

वाळूज एमआयडीसी परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच आजूबाजूला नागरी वसाहती विस्तारत आहेत. या भागात मद्यपी, बटन प्लेअर, गंजेटी तरुणांचे प्रमाण वाढले आहे. दारुच्या दुकानाशेजारीच अनधिकृतरीत्या मद्यपींची पिण्याची सोय हॉटेल-टपऱ्यांवर सहज होत आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. यानंतर काही काळ हा प्रकार बंद झाला होता. मात्र, हे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. यामुळे येथील गुंडगिरीला ‘चालना’ मिळत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही महिन्यांतील घटना

  • १७ जानेवारी - शकुल राऊत नावाच्या तरुणाला पिस्टलचा धाक दाखवत त्याच्याजवळील पैसे लुबाडले

  • २७ जानेवारी - अश्विन आदीक नावाच्या तरुणाला दोन गुंडांनी विनाकारण फायटरने मारहाण करत जखमी केले.

  • १४ फेब्रुवारी - इनोव्हेटेटीव्ह टेक्नॉलाजीचे अधिकारी गजानन भालेकर यांना सोनवणे नावाच्या आरोपीकडून कंपनीत मारहाण

  • २३ फेब्रुवारी - सवेरा फार्मा कंपनीसमोर आशीष श्रीसुंदर नावाच्या मद्यपीचा गेटसमोर बराच वेळ धुडगूस

  • उद्योजकांची गुंडांकडून दिवसाढवळ्या लुटमार

  • पैशांसाठी धमक्या, ‘ब्लॅकमेलिंग’ वाढले

  • पोलिसांचे दुर्लक्ष, उद्योजक त्रस्त, बंदोबस्ताची मागणी

माहितीच्या अधिकाराचा करू लागले गैरवापर

वाळूज एमआयडीसीत ठरावीक कंपन्यांना लक्ष्य केले जाते. माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करीत कंपन्यांची माहिती मागविली जाते. अधिकारी, संचालकांशी संपर्क साधत त्यांना वेठीस धरत रक्कमेची मागणी केली जाते. ही मागणी पूर्ण न केल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी ही मंडळी देत असल्याने उद्योजक त्रस्त आहेत.

ती काळी कार कोणाची?

वाळूज एमआयडीसी परिसरात एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये फिरणाऱ्या गुंडांची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. या कारमध्ये सात-आठ टगे नेहमीच लाठ्याकाठ्यांसहित या भागात वावरतात. ही स्कॉर्पिओ नेहमीच एमआयडीसी परिसरात दिसून येते. ही कार कोणाची आहे तसेच यावर कारवाई व्हावी, अशी मागणीदेखील उद्योजकांनी केली आहे.

तात्पुरती नको, ठोस कारवाई करा

लुटीचे, मारहाणीचे किंवा धमकीचे प्रकार घडल्यानंतर पोलिस नेहमीप्रमाणे तात्पुरती कारवाई करतात. काही दिवस हे प्रकार बंद झाल्यासारखे वाटते. पुन्हा गुंड प्रवृत्तीचे लोक डोके वर काढतात. त्यामुळे अशा टग्यांवर ठोस कारवाई करा, सुरक्षेची कायमस्वरूपी उपाययोजना करा, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

एमआयडीसी परिसरात उद्योजक मेहनतीने त्यांच्या कंपनी चालवतात. यातून अनेकांना रोजगार प्राप्त होतो. मात्र, काही महिन्यांपासून उद्योजकांना गुंडगिरीला सामोरे जावे लागत आहे. पोलिस प्रशासनाने यावर पावले उचलणे गरजेचे आहे. अशा काही घटना घडल्यास पोलिसांकडून वेळीच मदत मिळाल्यास या प्रकारांना आळा बसू शकेल.

- रमाकांत पुलकुंडवार, सहसचिव, मसिआ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT