crime marathi news drugs worth 250 crore seized in chhatrapati sambhajinagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये २५० कोटींचे अमली पदार्थ जप्त

गुजरातहून मुंबईला विक्रीसाठी जाणारे २३ किलो कोकेन आणि ११.७ किलो मेफेड्रोन असा सुमारे अडीचशे कोटींचा साठा येथे जप्त

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : गुजरातहून मुंबईला विक्रीसाठी जाणारे २३ किलो कोकेन आणि ११.७ किलो मेफेड्रोन असा सुमारे अडीचशे कोटींचा साठा येथे जप्त करण्यात आला. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली. अमली पदार्थांविरोधी येथील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यातील एकाने धारदार वस्तू डोक्यात मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दुसऱ्या आरोपीस विशेष न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

जितेशकुमार हिन्होरिया प्रेमजी (वय ४५, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर), संदीप शंकर कुमावत (४०, रा. वाळूज, छत्रपती संभाजीनगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. जितेश याच्या कांचनवाडी भागातील ‘फ्लोरेंझा व्हिला’ या बंगल्याच्या तपासणीत २३ किलो कोकेन, २.९ किलो मेफेड्रोन, तीस लाख रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

‘डीआरआय’चे उपसंचालक राहुल निगवेकर यांच्या देखरेखीखाली २० ऑक्टोबरपासून ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी जितेशकुमार आणि संदीप कुमावतला अटक करण्यात आली आहे. कुमावत हा गुजरातमधून आणलेले अंमल पदार्थ शहरांत पोचविण्यासाठी मदत करीत होता, असे सांगण्यात आले.

जितेश याची होती कंपनीच

जितेश याची पैठण औद्योगिक वसाहतीमध्ये ‘महालक्ष्मी इंडस्ट्रीज नावाची कंपनीच असून तेथे मेफेड्रोन आणि केटामाईन हे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात असल्याचे छाप्यात उघड झाले. जितेशकुमार हे अमली पदार्थ गुजरातेतून आणत असे. त्याचा कंपनीत साठा करून योग्य दिवस, वार निवडून तो मुंबईसह अन्य शहरांत पुरवठा करत असे.

त्याच्या याच कंपनीतून अधिकाऱ्यांनी साडेचार किलो (४.५) मेफेड्रोन आणि चार किलो ३०० ग्रॅम केटामाइन जप्त केले. याशिवाय सुमारे ९ किलो ३०० ग्रॅम मेफेड्रोनचे मिश्रणही जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती ‘डीआरआय’ ने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT