crime police
छत्रपती संभाजीनगर

Crime news : बाल्कनीतल्या खिडकीतलं प्रेम; आईसमोरून अल्पवयीन मुलीला पळवत गाठलं गाव पण...

क्रांती चौक पोलिसांत मुलीला पळवून नेल्यासंदर्भात गुन्हा दाखल झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : बाल्कनीतून ‘तिची’ खिडकी दिसायची, यातून दोघांची ओळख झाली होती. ओळखीनंतर दोघांत प्रेम बहरले. दरम्यान मुलगी मुळ गावाहून आईसोबत मध्यवर्ती बसस्थानकावर आल्यानंतर त्याने फूस लावत अल्पवयीन मुलीला बसस्थानकावरुन पळवून नेले.

याप्रकरणी सुरवातीला क्रांती चौक पोलिसांत मुलीला पळवून नेल्यासंदर्भात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी लोकेशन मिळवत एक एक करत यवतमाळ जिल्ह्यातील आरणी येथे जाऊन आरोपी तरुणाला अटक केली.

दरम्यान आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन आरोपीविरोधात अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल झाला असून राहूल महादेव गुमनाके (२२, रा. लाख (रायाची), जि. यवतमाळ) असे त्याचे नाव आहे.

फिर्यादीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील ४० वर्षीय फिर्यादी ही रांजणगाव येथे राहते. क्रांती चौकात तो राहत असलेल्या बाल्कनीतून पिडीतेच्या घराची खिडकी दिसत होती. यातून ओळख झाली. त्याने प्रेमाचे आमिष दाखवत अत्याचार केले. दरम्यान काही दिवसानंतर पिडीता ही आईसह गावी गेली होती. १९ जूनरोजी पिडीता बसने मध्यवर्ती बसस्थानकावर उतरली. त्याचवेळेस त्याने तिला फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांत फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

त्याने तिला घेऊन गाठले गाव

आरोपी राहुलने अल्पवयीन पिडीतेला पळवून नेत तो यवतमाळला गेला. तिथे शिक्षण घेणाऱ्या जवळच्या नातेवाईकाकडे तो पिडीतेला घेऊन राहिला. त्यानंतर घाटंजी येथे नातेवाईकाकंडे घेऊन गेला. विशेष म्हणजे पोलिसांनी तपास सुरु केल्यापासून सीसीटीव्ही सह तांत्रिक बाबीच्या अनुषंगाने माहिती काढत होते.

दरम्यान क्रांती चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी उपनिरीक्षक अशोक शिर्के यांचे पथक आरोपीच्या मागावर पाठविले. उपनिरीक्षक शिर्के यांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपीला आरणी तालुक्यातून (जि.यवतमाळ) अटक केली.

त्याच्याविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात अत्याचाराचा ३७६ दोन (एन) कलमासह, पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपीला २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती निरीक्षक पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT