Chhatrapati Sambhaji Nagar Crime News  Esakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News: एका चिक्कूवरून गावात तणावाचं वातावरण; दोन गटात बेदम मारहाण, पोलिसांची मागवली कुमक

अंकिता खाणे (Ankita Khane)

छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील बिडकीन गावामध्ये काल (रविवारी) एका 'चिक्कू'वरून दोन गट भिडल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामध्ये काही लोकं जखमी झाले आहेत. गावातील तणावाची परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवावी लागली. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकूण 17 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिडकीन पोलिस ठाण्यात रईस शेख बाबू (वय 33 वर्षे, व्यवसाय फळविक्रेता) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 'त्यांचा अल्पवयीन भाचा बिडकीन बस स्टँड परिसरात फळाच्या दुकानात बसलेला होता. यावेळी तिथे कृष्णा वाघ हे चिक्कू विकत घेण्यासाठी आले. त्यांनी चिक्कू दाबून पाहिला तेव्हा तो चिकू फुटला. यावेळी दुकानात बसलेल्या मुलाने चिक्कू फोडू नका असे म्हणल्यावरून दोघांमध्ये वाद झाला.

सुरवातीला शाब्दिक वाद सुरू झाला आणि त्यांनतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यावेळी चिकू विकत असलेला मुलगा जखमी झाला. त्यानंतर फिर्यादी रईस शेख हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी आपल्या जखमी भाच्याला घाटी रुग्णालयात घेऊन जात असताना आणखी काही जण तिथे जमा झाले. त्यानंतर पुन्हा एकदा वाद सुरू झाला.

दोन्ही गटाचे लोकं जमा झाले. गोंधळ सुरू झाला, दोन्ही गटाकडून एकमेकांना हाणामारी सुरू झाली. काहींनी दगड फेकून मारले. त्यातील एका व्यक्तीने वस्तारा मारल्याने त्यामध्ये एक जण जखमी झाला. या घटनेत एकूण ५ ते ६ जण जखमी झाले, त्यांच्यावर बिडकीन शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणली.

विशेष म्हणजे तणावाची परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवावी लागली. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील एकूण 17 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Chitra Wagh: चित्रा वाघ यांच्या गळ्यात अखेर आमदारकीची माळ, जाणून घ्या कसा आहे 26 वर्षांचा राजकीय प्रवास

Maharashtra Assembly election updates: ''विधानसभा निवडणुकीच्या घोषणेबद्दल भाजपला आधीच माहिती होती'', मनोज पांडेंचा दावा

एका हास्यपर्वाचा अंत! अतुल परचुरे अनंतात विलीन; लाडक्या मित्राला निरोप देताना संजय मोनेंना अश्रू अनावर

Online Voting Slip : मतदार स्लिप ऑनलाईन पद्धतीने मिनिटात डाउनलोड करा; सोप्या अन् झटपट स्टेप्स

गुणरत्न सदावर्ते यांची बिग बॉस 18 मधून एक्झिट ; हे आहे कारण

SCROLL FOR NEXT