Crime Record on QR Code in just seconds first experiment in Chhatrapati Sambhajinagar police station  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : आता ‘क्राइम रेकॉर्ड’ सेकंदात ‘क्यूआर कोड’वर!

छत्रपती संभाजीनगरमधील पोलिस ठाण्यात राज्यातील पहिलाच प्रयोग

सुषेन जाधव

छत्रपती संभाजीनगर : पोलिस ठाण्यांमध्ये जुने रेकॉर्ड सांभाळताना अधिकाऱ्यांची दमछाक होते. इतकेच नव्हे, तर ठाण्यातील एखाद्या तपास अधिकाऱ्याकडून आजवर संबंधित गुन्ह्यांच्या फायलीही गहाळ होतात. मात्र, यावर छावणी पोलिस ठाण्याने अगदीच कमी खर्चात छान संकल्पना प्रत्यक्षात उतरविली असून केवळ एका क्यूआर कोडच्या स्कॅनवर वर्षानुवर्षांचे कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड आता ‘ओपन’ होणार आहे.

यातून केवळ वेळच वाचतो असे नाही, तर एखादे क्राइम रेकॉर्ड पाहिजे असलेल्या ठाण्यातील अधिकाऱ्याला जसेच्या तसे ‘सेव्ह’ ठेवणेही आपोआपच बंधनकारक झाले आहे. मागील सहा महिन्यांपासून यावर काम सुरू होते, अशी माहिती पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. हा राज्यातील पहिला प्रयोग असल्याचा दावाही त्यांनी केला.

मोठ्या आकाराच्या लाल कपड्यात वर्षानुवर्षांचे कागदी रेकॉर्डचे गठ्ठे बांधलेले आपणास सरकारी कार्यालयात दिसतात. पोलिस ठाणेही यास अपवाद नाही. मात्र, निरीक्षक देशमाने यांनी छावणी पोलिस ठाण्याचा पदभार घेताच त्यांनी ही परिस्थिती बदलण्याचे ठरविले अन् तिथून सुरू झाला ‘क्यूआर कोडचा’ प्रवास.

बदली झाल्यानंतरही काम सुलभच

विशेष म्हणजे निरीक्षक देशमाने यांनी भविष्यात होणारे बदल याचाही विचार करून ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जसे की, ‘क्यूआर’ कोड प्रणाली हाताळणाऱ्या तिन्ही व्यक्तींची इतर ठाण्यात बदली झाल्यास त्यांच्यानंतर हा प्रवास सुरू राहण्यासाठी इतर व्यक्तीलाही त्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ठाण्यातील एका खोलीत बनवून घेतलेल्या लोखंडी रॅकमध्ये हे ‘क्यूआर कोड’ चिटकवलेले खोके ठेवण्यात आले असून त्यासाठी अवघा ३० ते ३५ हजार रुपये खर्च झाला आहे.

काय आहे प्रणाली?

निरीक्षक देशमाने यांच्या संकल्पनेतून ठाण्यात ए-४ आकाराचे आणि मोठ्या फाइल्स बसतील अशा आकाराचे तब्बल ७५ ते ८० बॉक्स बनविले. या बॉक्सवर निळ्या, नारंगी, लाल, पिवळ्या आकाराचे क्यूआर कोड बसविले आहेत.

या बॉक्समध्ये १५ वर्षांपूर्वीचे (खुनासहित ३० वर्षांपासूनचे) क्राइम रेकॉर्ड वर्षनिहाय ठेवलेले आहेत. विशेष म्हणजे हे क्यूआर कोड स्कॅन करून कोणीही माहिती काढू शकत नाही. त्यासाठी पासवर्ड पद्धत असून तो पोलिस निरीक्षक यांच्यासह केवळ तीन व्यक्तींकडेच आहे. महत्त्वाचे म्हणजे ८० बॉक्समध्ये जर एखाद्या तपास अधिकाऱ्याला २०१५ चा ‘एफआयआर’ पाहिजे असल्याचे अधिकारी ‘क्यूआर’ कोड प्रणाली हाताळणाऱ्या व्यक्तीला गुन्हा क्र. (सीआर) सांगेल.

त्यानंतर संबंधित व्यक्ती अवघ्या एक मिनिटाच्या आत संबंधित एफआयआर तथा दस्तऐवज काढून देते. बॉक्समधून जो दस्तऐवज घेतला तो कोणी घेतला, कधी घेतला हे तारखेनिशी एका रजिस्टरवर नोंद होते. त्यानंतर दस्तऐवज कधी परत केला, याचीही रजिस्टरवर नोंद होते.

अगोदर एखादा दस्तऐवज मिळविण्यासाठी वर्षानुवर्षांची धुळीची गाठोडी सोडावी लागत असत. आता ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर काही सेकंदांतच वर्षानुवर्षांचे ‘क्राइम रेकॉर्ड’ सापडते. ही माझी संकल्पना असली तरी यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने मेहनत घेतली.

-कैलास देशमाने, पोलिस निरीक्षक, छावणी पोलिस ठाणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT