अब्दुल सत्तार  
छत्रपती संभाजीनगर

अब्दुल सत्तार यांच्यासाठी सिल्लोडमध्ये शक्तीप्रदर्शन

सिल्लोड, सोयगाव तालुक्यांच्या ग्रामीण भागातील सत्तार समर्थक मोठ्या प्रमाणावर सहभागी

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड (जि.औरंगाबाद) - शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांकडून येथे फेरी काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सिल्लोड, सोयगाव तालुक्यांच्या ग्रामीण भागातील सत्तार समर्थक मोठ्या प्रमाणावर सहभागी होते. फेरीनंतर सभा झाली.

राज्यमंत्री सत्तार यांच्या येथील संपर्क कार्यालयापासून फेरीला सुरूवात झाली. मुख्य रस्त्याने गेलेल्या या फेरीचे प्रियदर्शनी चौकामध्ये सभेमध्ये रूपांतर झाले. समर्थकांच्या हाती असलेल्या फलकांवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे तसेच एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमा झळकल्या होत्या. दरम्यान, शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या विरोधात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जालन्यात मंगळवारी (ता.२८) मोर्चा काढण्याचा निर्णय शिवसेना जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.

सत्तार आलेच नाहीत

एकनाथ शिंदे यांच्यासोबत अन्य काही मंत्री, आमदारांसह सत्तार सध्या गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये आहेत. त्यांच्या समर्थनार्थ काढल्या जाणाऱ्या फेरीत ते हेलिकॉप्टरने येऊन सहभागी होतील, असे नियोजन कालपासून होते. परंतु सत्तार येथे आलेच नाही. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे चिरंजीव उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी फेरीसह सभेचे नियोजन केले.

पैठणमध्ये भुमरे समर्थकांची फेरी

पैठण : राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर येथे रविवारी (ता.२६) पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंत्री भुमरे यांच्या समर्थनार्थ भव्य फेरी काढून शक्तीप्रदर्शन केले. ग्रामीण भागातून कार्यकर्ते वाहनांतून आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून फेरीला सुरुवात झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे झिंदाबाद, एकनाथ शिंदे, संदीपान भुमरे ‘तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या.

बंडखोरांच्या प्रतिमेची नळदुर्गला धिंड

नळदुर्ग (जि.उस्मानाबाद) ः शहर व परिसरातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बंडखोर आमदार तानाजी सावंत व ज्ञानराज चौगुले यांच्या प्रतिमेची धिंड काढली. जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT