आडुळ (औरंगाबाद): पैठण - फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी गुरुवारी (ता.६) रोजी आडुळ (adul gram panchayat) येथे अचानक भेट दिली. येथील सर्व दुकाने अकरा वाजेनंतरही उघडी दिसल्याने संतप्त झालेले मोरेंनी गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या (disaster management committee) सदस्यांना बोलावून चांगलेच खडे बोल सुनावले. आपत्ती व्यवस्थापन समितीने (covid 19) व्यवस्थित काम केले नाही तर लवकरच आडुळ ग्राम पंचायतीचा बरखास्तीचा प्रस्ताव पाठविण्यात येईल असेही सांगितले.
यानंतर व्यवस्थापन समितीने तत्काळ दुकाने बंद केली. यानंतर श्री. मोरे यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. उद्यापासून नागरिकांसाठी योग्यरित्या चांगले नियोजन करावे. कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची पुरेपुर काळजी घ्यावी.आडूळ परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर कसा आटोक्यात आणता येईल अशा कडक सुचना उपस्थित आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना केल्या.
आरटीपीसीआर / अँटीजन चाचण्यांची आकडेवारी खूपच कमी असल्याने स्वप्नील मोरे यांनी नाराजी व्यक्त केली. अकरा वाजेनंतर एकही बाजार पेठेतील दुकाने उघडी राहता कामा नये. जो दुकानदार नियमांचे पालन करणार नाही त्याच्याकडून दंड वसूल करून त्याच्यावर कडक कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश पाचोड पोलिस ठाण्याचे साह्ययक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, आडूळच्या सरपंच शेख शमीम नासेर, ग्रामविकास अधिकारी बळीराम कळमकर, तलाठी भगवान ढोरमारे यांच्यासह दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ भुषण आगाज,सहाय्यक फौजदार रविंद्र क्षिरसागर, उदयसिंह तवार, डॉ. गजानन आगलावे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, कृषी सहायक स्वाती वाघ, माजी सरपंच हाजी मुक्तार मौलाना आदी उपस्थित होते. यावेळी आडुळ येथील मुस्लिम समाज बांधवांनी कोरोना काळात रुग्ण व प्रशासनास मदत होईल म्हणून येथील मदरसा अल बनात आयेशा सिद्दीका (रजी) येथे कोविड १९ सेंटर उभारवा अशी विनंती केली. सध्या कोरोना मुळे हा मदरसा बंद आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.